Site icon

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रध्वज हा आपला अभिमान असल्याने प्रत्येक नागरीकाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी. सामाजिक संस्थांनी राष्ट्रीय ध्वज इतस्त: दिसून आल्यास स्वयंसेवकांच्या माध्यमातून संकलन करून योग्य त्या सन्मानाने विल्हेवाट लावावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे.

बारकुंड यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय सणाच्या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लास्टिक राष्ट्रध्वजांची मोठ्या प्रमाणत खरेदी व विक्री केली जाते. लहान मुलांसह अनेक व्यक्ती राष्ट्रभक्तीमुळे उत्साहापोटी राष्ट्रध्वज खरेदी करतात. ते ध्वज त्याचदिवशी व दुसऱ्या दिवशी इतस्त: टाकले जाण्याची व त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्थांनी स्वयंसेवकांमार्फत राष्ट्रध्वज संकलित करून त्याची सन्मानाने विल्हेवाट लावावी, असेही पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

The post राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे आवाहन appeared first on पुढारी.

Exit mobile version