राष्ट्रीय एकता दिन : धुळ्यात राष्ट्रीय एकता दौड संपन्न

एकता दौड www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.31) धुळ्यात राष्ट्रीय एकता दौड पार पडली. धुळे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, मनपा प्रशासन, धुळे जिल्हा पोलिस दल, एस.डी.आर. एफ., एस.आर.पी. एफ. बॅण्ड पथक, धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विविध क्रीडा संघटना, विद्यार्थी, नागरिक व खेळाडू या राष्ट्रीय एकता दौडमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

एकता दौडच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी टाॅवर गार्डन येथील भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देऊन राष्ट्रीय एकता दौडला हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रांरभ केला. सरदार वल्लभभाई पटेल उद्यानापासून (टॉवर गार्डन) रॅली सुरू होऊन जमनालाल बजाज मार्ग, आग्रा रोड, महानगरपालिकेची जुनी इमारतमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रॅलीचा समारोप झाला. या एकेता दौडमध्ये जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, धुळे महापालिकेचे उपआयुक्त नितीन कापडणीस, उपविभागीय पोलिस अधिकारी सिंगा ऋषिकेश रेड्डी, ईश्वर कातकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, धुळे महापालिकेचे विजय सनेर, मनोज वाघ, ॲथलेटिक्स संघटनेचे हेमंत भदाणे, योगेश वाघ, योगेश पाटील, 48 एनसीसी बटालियनचे विद्यार्थी, महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, मनपाचे अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा :

The post राष्ट्रीय एकता दिन : धुळ्यात राष्ट्रीय एकता दौड संपन्न appeared first on पुढारी.