राष्ट्रीय महामार्गावरील लुटारूंचा अखेर पर्दाफाश! हॉटेलच्या सीसीटीव्हीतून खुलासा

म्हसरूळ (जि.नाशिक) : मंगळवारी (ता.२३) पहाटे ट्रकचालकाकडून ६ दरोडेखोरांनी रोकड तसेच मोबाईल लुटले असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. मात्र पोलीसांनी सुध्दा रात्री राज्य व राष्ट्रीय महामार्गावर टोळीचा पर्दाफाश केला आहे. मध्यरात्रीचा प्रकार...

राष्ट्रीय महामार्गावरील लुटारूंचा अखेर पर्दाफाश

मंगळवारी (ता.२३) पहाटे दिंडोरी तालुक्यातील आशेवाडीत ट्रकचालकाला ६ दरोडेखोरांनी रोकड तसेच मोबाईल लुटले. संशयित दुचाकीवरून नाशिक शहराकडे येत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दिली होती. त्यानंतर रात्रगस्तीवरील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी जात हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले. त्यात दरोडेखोर दिसून आले. फुटेजमध्ये सराईत नकुल परदेशी असल्याचे कर्मचारी विलास चारोस्कर यांनी ओळखले. त्यानंतर सिडकोतून चौघांना ताब्यात घेत चौकशी केल्यावर लूट केल्याची सांगितले. तसेच म्हसरूळ, अंबड पोलिस ठाणे हद्दीत व आशेवाडी येथे लूट केल्याची कबुली दिली.

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

सहा संशयितांना बेड्या

रात्री राज्य व राष्ट्रीय महामार्गावर चालकांना शस्त्राचा धाक दाखवून जबरी लूट करणाऱ्या टोळीचा पंचवटी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीतील सहा संशयितांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून शस्त्रे, दोन दुचाकी मोबाईल, रोकड असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित नकुल परदेशी, गौरव अरुण माळी, (परदेशी चाळ, हनुमानवाडी), मयूर रत्नाकर पाचोरे (रा. मेहेरधाम पेठरोड), प्रणव विनोद शेवाळे (सिडको), शुभम राजू पाटील (रा. श्रीकृष्ण चौक सिडको), नीलेश मदन गर्दे (रा. सिडको) यांना ताब्यात घेतले आहे. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

पंचवटी पोलीसांची कामगिरी
सदर कामगिरी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, निरीक्षक( गुन्हे) अशोक साखरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सत्यवान पवार, सहायक उपनिरीक्षक बाळनाथ ठाकरे, नाईक किरण सानप, सागर कुलकर्णी, दिलीप बोंबले, विलास चारोस्कर, कुणाल पचलोरे, कल्पेश जाधव, राजेश राठोड, राकेश शिंदे, नितीन जगताप, गोरक्ष साबळे, नारायण गवळी, उत्तम खरपडे, घनश्याम महाले, अविनाश थेटे यांनी पार पाडली