राष्ट्रीय युवा दिन : एसव्हीकेटीमध्ये राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती

नाशिकरोड www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

स्वामी विवेकांनद यांच्याकडे उत्तम बौध्दीक क्षमता, समयसूचकता व स्मरणशक्ती होती. शिकागो येथे गाजलेले त्यांचे भाषणावरुन ते जगभरात प्रसिध्दीस आले. आजही स्वामी विवेकांनद युवकांचे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी केले.

देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात गुरुवारी (दि. १२) राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी मनोगत व्यक्त केले. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लहानपनापासून उत्तम संस्कार केले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजही आदराने नाव घेतले जाते. असे प्राचार्य डॉ. काळे यांनी सांगितले. विद्यार्थी गौरव बोराडे, उपप्राचार्य सोपान एरंडे, वैशाली कोकाटे आदींनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी माहीती दिली. सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख डॉ. जयश्री जाधव यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाचे नियोजन केले. शाम जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाय उपपप्राचार्य डी. टी. जाधव, एस. के. जाधव, सुनिल जाधव, डॉ. के. आर. लभडे, देवराम ढोली, दिनेश कानडे, विशाल अलाने, अण्णा कदम आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post राष्ट्रीय युवा दिन : एसव्हीकेटीमध्ये राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती appeared first on पुढारी.