राहण्यायोग्य शहरांच्या यादीत नाशिक घसरले; पहिल्या १०मध्ये स्थान नसल्याने प्रशासनाला धक्का

नाशिक : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयातर्फे जाहीर झालेल्या इज ऑफ लिव्हिंग इंडेक्समध्ये नाशिकच्या क्रमवारीमध्ये घसरण झाली असून, २१ वरून ३८ वे स्थान मिळाल्याने पहिल्या दहा शहरांमध्ये नाशिकचे स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. 

बेंगळुरू शहराला प्रथम क्रमांक

केंद्र सरकारने राहण्यायोग्य शहरांचे सर्व्हेक्षण केले होते. सर्व्हेक्षण करताना शिक्षण, आरोग्य, निवारा, सुरक्षा, आर्थिक विकास व इतर सुविधांची स्थिती काय आहे, याचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार गुणांकन देण्यात आले. गुणांकनासाठी दहा लाख व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली शहरे असे दोन गट तयार केले होते. दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या गटात १११ शहरे होते. त्यात बेंगळुरू शहराला प्रथम क्रमांक मिळाला. पुणे शहर दुसरे, अहमदाबाद तिसऱ्या क्रमांकावर राहिले. चेन्नई, सुरत, नवी मुंबई, कोईम्बतूर, वडोदर, इंदूर, बृहन्मुंबईचाचा समावेश पहिल्या दहा शहरांमध्ये राहीला.

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

२१ वरून ३८ व्या क्रमांकावर  

२०१८ मध्ये राहण्यायोग्य शहरांमध्ये नाशिकचे स्थान २१ वे होते. गुरुवारी (ता. ४) देशभरातील राहण्यासाठी योग्य असलेल्या शहरांच्या यादीत ३८ वे स्थान मिळाले. २०१८ मध्ये नाशिकला ४४.७९ गुण मिळाले होते. या वर्षी ५१.२९ गुण मिळाले. दहा लाख लोकसंख्येपेक्षा अधिकच्या गटात महापालिका कामगिरी निर्देशांकातही नाशिकला स्थान मिळाले नाही. या गटात इंदूर शहराला पहिला क्रमांक मिळाला. पिंपरी- चिंचवड चौथ्या, पुणे पाचव्या स्थानावर, तर बृहन्मुंबई आठव्या स्थानावर आहे. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा