रिक्षाचालकाची अशीही समाजसेवा! दोन वेळचे पोट भरण्यासोबतच व्यवसायाचा समाजासाठी उपयोग

सिडको (नाशिक) : रिक्षाचालकांना सहसा कोणी बरे पाहत नाही; परंतु काही रिक्षाचालक असेही आहेत, की जे समाजासमोर खऱ्या अर्थाने आदर्श काम करताना दिसत आहेत. त्यातलीच एक म्हणजे भगवान मराठे. जे गेल्या काही वर्षांपासून रिक्षा व्यवसाय करीत आहेत. परंतु, केवळ रिक्षा चालवून दोन वेळचे पोट भरण्यापेक्षा या व्यवसायाचा समाजासाठी उपयोग करून ते सध्या आदर्श रिक्षाचालक म्हणून गणले जात आहे. त्यांच्या या ‘बोलक्या रिक्षा’चे सर्वत्र कौतुक होत आहे. 

रिक्षाचालकाची अशीही समाजसेवा! 
पोलिस व प्रशासनाला जेवढी मदत करता येईल तेवढी ते करण्याचा प्रयत्न करतात. विशेष करून समाजहिताच्या गोष्टींकडे त्यांचे अधिक लक्ष असते. विविध शासनाच्या योजना व मार्गदर्शक तत्त्वे ते लोकांपर्यंत पोचवत असतात. काही दिवसांपासून त्यांनी दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालावे म्हणून रिक्षावर फलक लावत प्रबोधन केले होते. तर, कोरोना काळात त्यांची कामगिरी खरोखर वाखाणण्याजोगी होती.

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

व्यवसायाचा समाजासाठी उपयोग; ‘बोलक्या रिक्षा’चे सर्वत्र कौतुक 

शासन नियमांचे पालन करून प्रत्येकाने मास्क वापरणे व सामाजिक अंतर ठेवणे याकरिता प्रबोधन करताना दिसतात. नुकतेच त्यांनी रिक्षात बसून रस्त्याने येताना-जाताना माईकद्वरे नियमाची उद्‌घोषणा करत प्रत्येकाने मास्क घाला, सामाईक अंतर ठेवा व लस टोचून घ्या म्हणून सांगताना दिसत आहेत. त्यांच्या या सामाजिक व लोकप्रबोधनपर सामाजिक कार्याचे पोलिस प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिक कौतुक करताना दिसत आहेत. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा
विशेष दिनाला मोफत सेवा 
१५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे कामगार दिन, अपंग दिन व महिला दिनाच्या दिवशी ते त्या-त्या प्रवाशांना मोफत रिक्षा सेवा देतात. धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढू नका, दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरा, महिलांनी आपले दागिने सांभाळा, पोलिसांना व प्रशासनाला मदत करा, मास्क व सामाजिक अंतर ठेवा असे घोषवाक्य वापरून ते समाज प्रबोधन करतात. याकरिता माजी पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी त्यांचा गौरव करून कौतुकाची थाप दिली आहे. 

आपण समाजाचे काही देणे लागतो, या सामाजिक भावनेतून मी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने घालून दिलेल्या नियमांची नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत आहे. त्या मुळे मला आत्मिक समाधान मिळते. 
-भगवान मराठे, रिक्षाचालक