रुग्णालयात बेड मिळेना! कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने ऑक्सिजन सिंलेडरसह गाठले पालिका मुख्यालय, पाहा VIDEO

नाशिक : राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे, बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना शहरात  निर्बंध कोठोर करण्यात येत आहेत. दरम्यान रुग्णांच्या वाढती संख्येमुळे शहरात रुग्णांना पुरेशा सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान शहरातील रुग्णालयात बेड मिळत नसल्याने एका कोरोना बाधित रुग्णाने चक्क महानगरपालिका मुख्यालय गाठल्याने खळबळ उडाली. 

 

नाशिक शहरातील  बिटको, जाकीर हुसेन तसेच जिल्हा रुग्णालयांमध्ये बेड मिळत नसल्यामुळे भाऊसाहेब कोळे (वय ३८) राहणार कामटवाडा, सिडको हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ऑक्सीजन सिलेंडर लावून  माहानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणण्यात आले. दरम्यान रुग्णाची ऑक्सिजन पातळी केवळ ३५ असून तो अत्यावस्थ आहे. तसेच डीजीपी नगर 2 येथील रहिवासी अजिंक्य संकपाळ  (वय 28) या रुग्णाची कोरोना टेस्ट काल पॉझिटिव्ह आली असूव तो देखील महापालिका रुग्णालयांमध्ये आला आहे.

शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, रुग्णालयांमध्ये बेड फुल होत असल्याचे वास्तव आहे. मात्र, महापालिकेने शहरात ११९ रुग्णालये कोविड म्हणून घोषित करताना, ऑक्सिजन बेडची पुरेशी व्यवस्था केल्याचा दावा आयुक्त कैलास जाधव यांनी केला होता.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

रुग्णाचा ठराविक रुग्णालयांचा आग्रह

रुग्णांना शहरात बेड मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. मात्र, वास्तवात ९२१ ऑक्सिजन बेड रिक्त असल्याचे महापालिकेच्या डॅशबोर्डवर दिसत आहे. एक हजारावर सर्वसाधारण बेड शिल्लक आहेत. मात्र, रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालयांची माहिती नाही व ठराविक रुग्णालयांमध्येच रुग्ण दाखल करण्याचा आग्रह असल्याने समस्या निर्माण होत असल्याचा दावा आयुक्त जाधव यांनी केला आहे. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड