
जळगाव : मध्य प्रदेशातील सीहोर येथे शिवमहाकथापुराण महोत्सव व रूद्राक्ष महोत्सवासाठी गेलेल्या खान्देशातील भाविकांच्या वाहनाचा अपघात झाल्याने यात दोन महिला जागीच ठार झाल्या तर अन्य जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.
सीहोरला रूद्राक्ष महोत्सवात तुफान गर्दी, शिस्तीचा अभाव यामुळे कालच चेंगराचेंगरी सारखी घटना घडली. यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना व अनेकजण बेपत्ता असल्याचे वृत्त ताजे असतानाच आज पहाटे जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा मध्यप्रदेशात अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
दोन्ही महिला जागीच ठार…
या अपघातात अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील दोन महिला शोभाबाई लुकडू पाटील (वय ५२), कमलबाई आत्माराम पाटील (वय ५५) यांचा सिहोर हुन घरी परत येत असताना मध्यप्रदेशात जुलवानिया गावाजवळ एमएच १९ डीव्ही ६७८३ इको गाडीचा अपघातात दोघ महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि.१७ रोजी सकाळी घडली.
चिमुकल्याचा मृत्यू…
रुद्राक्ष महोत्सवात जळगावचे विवेक विनोद भट्ट गुरुवारी पत्नी आणि दोन मुलांसह आले होते. याचदरम्यान, त्यांचा ३ वर्षांचा मुलगा अमोघ भट्टची तब्येत बिघडली, चालताना तो अधिकच आजारी पडला, जिथे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आज शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं. या बालकाचा अंत्यविधी मध्यप्रदेशातील सिहोर या ठिकाणीच करण्यात आलेला आहे. घटनास्थळी त्याच्या परिवारातील आई-वडील, काका, काकू, आजोबा उपस्थित असून आज रात्रीपर्यंत ते जळगावात दाखल होणार आहे.
हेही वाचा :
- एस. टी. कर्मचाऱ्यांच्या समस्या अधिवेशनात लावून धरू; कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये !: नाना पटोले
- नाशिक : अपघाती मृतांमध्ये 25 टक्के पादचारीच
- पणजीत पारंपरिक कार्निव्हलला परवानगी नाही; आपकडून सरकारचा निषेध
The post रुद्राक्ष महोत्सवादरम्यान भाविकांवर काळाचा घाला ; जळगावच्या तिघांचा मृत्यू appeared first on पुढारी.