रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

इगतपुरी (जि.नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या हॉटेल गारवा येथे हॉटेल रूम नंबर १०५ मध्ये अशी घटना घडली. ज्यामुळे उपस्थितांना धक्का बसला. असे काय घडले नेमके?

रूम नंबर १०५ चे गुढ कायम

मुंबई-नाशिक महामार्गावरील तळेगाव शिवारात महामार्गालगतच्या हॉटेल गारवा येथील कर्मचारी दादू भोरू भले (वय २२, रा. बोरली, जांबवाडी, ता. इगतपुरी) या युवकाने हॉटेल रूम नंबर १०५ या खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. १३) सकाळी घडली. याची माहिती हॉटेलचालक विलास त्र्यंबक खाताळे (रा. जुना गावठा, इगतपुरी) यांनी पोलिस ठाण्यात दिली.

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

हॉटेल कर्मचाऱ्याची आत्महत्या 

युवकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीयसूत्रांनी मृत घोषित केले. याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक फकिरा थोरात करीत आहेत.  

हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर