‘रेमडेसिव्हिर’चा काळाबाजार : अखेर ‘त्या’ डॉक्टरला पाच दिवसांची कोठडी 

म्हसरूळ (जि.नाशिक) : योगेश मोहिते यांच्या कोरोनाग्रस्त नातेवाइकांना तीन रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज होती. त्यासाठी शोधाशोध सुरू असताना रविवारी सायंकाळी त्यांना डॉ. मुळक यांच्याकडे इंजेक्शन असल्याचे समजले. वाचा पुढे....

कोरोनाग्रस्त नातेवाइकांना तीन रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज होती

या प्रकरणी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक सुरेश देशमुख यांच्या तक्रारींवरून रविवारी (ता. ११) रात्री उशिरा संशयित डॉ. रवींद्र मुळक (वय ३६, रा. पार्कसाइड होम, अमृतधाम, पंचवटी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार योगेश मोहिते यांच्या कोरोनाग्रस्त नातेवाइकांना तीन रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज होती. त्यासाठी शोधाशोध सुरू असताना रविवारी सायंकाळी त्यांना डॉ. मुळक यांच्याकडे इंजेक्शन असल्याचे समजले. डॉ. मुळक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी एका इंजेक्शनसाठी २५ हजारांची मागणी केली होती. डॉ. मुळक इंजेक्शनचा काळा बाजार करत असल्याचे लक्षात येताच, मोहिते यांनी इंजेक्शन घेण्याची तयारी दाखवत, रात्री आठच्या सुमारास अमृतधाम येथे भेटण्याचे ठरले. दरम्यान, मोहिते यांनी पोलिस कंट्रोल रूमला याबाबत माहिती दिली.

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

बाराशे रुपयांचे इंजेक्शन २५ हजारांत विकण्याचा प्रयत्न 

त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी डॉ. मुळक यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांच्याकडे तीन रेमडेसिव्हिर इंजेक्शन आढळले. या वेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी फसवणूक आणि औषध नियंत्रण किंमत, अत्यावश्यक वस्तू कायदा अशा विविध कलमांन्वये डॉ. मुळक यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. सोमवारी न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू 

पाच दिवसांची पोलिस कोठडी

पंचवटी परिसरातील नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरनेच बाराशे रुपयांत मिळणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी चक्क २५ हजार रुपयांत विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित डॉक्टरला सोमवार (ता. १२)पर्यंत न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.