रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीला सुरवात; नाशिक रोडसह नामांकित स्थानकांवर देणार तिकिटे

नाशिक रोड : भुसावळ विभागातील नाशिक रोडसह काही नामांकित स्थानकांवर प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. कोविडमुळे सर्वत्र प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जात नव्हती. ही तिकिटे सुरू केली असून, प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये याची दक्षता सध्या रेल्वे प्रशासन घेत आहे. 

प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीला सुरवात 
रेल्वे प्रशासनाच्या सूचनेनुसार भुसावळ विभागातील काही नामांकित स्थानकांवर ११ मार्च ते १० जूनपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट सुरू केले जात आहे. त्याचे मूल्य ५० रुपये असून, हे दर केवळ या नामांकित स्थानकांवर लागू होतील. या स्थानकांमध्ये नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, अमरावती, खंडवा यांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी पर्यटन प्रशासकीय केंद्र आहेत अशा ठिकाणी असणाऱ्या रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत वाढविण्यात आली आहे. गर्दी होऊ नये, हा यामागचा उद्देश असून, लोकांनी प्लॅटफॉर्मवर येऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे.

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये याची दक्षता

दरम्यान, नाशिक रोड व इतर रेल्वेस्थानकांवर गाडी येण्याच्या आधी प्रवाशांना पंधरा मिनीट आधी सोडले जाते. यासाठी नाशिक रोड रेल्वेस्थानकाच्या बाहेर रिक्षा स्टँडच्या जागी प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून बसवले जाते. प्लॅटफॉर्म तिकीट काढणार यांची संख्या अत्यल्प आहे. कोरोनाचा धोका वाढू नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकीट दर वाढविण्यात आले आहे. 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना