नाशिक : मध्य रेल्वेने मनमाड- सिकंदराबाद, मुंबई- सिकंदराबाद आणि नांदेड- मुंबईदरम्यान विशेष गाडी सुरू केली आहे. मनमाड-सिंकदराबाद विशेष गाडी (०७०६३ डाउन) ही बुधवार (ता. २)पासून सुरू होत आहे. पुढील आदेशापर्यंत ही गाडी मनमाडहून रात्री आठ वाजून ५० मिनिटांनी रवाना होईल. तर, अप सिकंदराबाद-मनमाड (०७०६४) गाडी मंगळवार (ता. १)पासून सुरू झाली आहे.
कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच या गाड्यांमध्ये प्रवेश
नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परभणी, पूर्णा, नांदेड, उमरी, धर्माबाद, बासर, धर्माबाद, निजामाबाद, कामारेड्डी, वाडियाराम, मेदचल, बोलाराम येथे ती थांबेल. नांदेड-मुंबई अप गाडी (०७६११) येत्या गुरुवार (ता. ३)पासून नांदेडहून रात्री दहाला सुटेल. मनमाड व नाशिक रोडला ती थांबेल. डाउन मुंबई- नांदेड (०७६१२) गाडी शुक्रवार (ता. ४)पासून मुंबईहून सायंकाळी पावणेसातला सुटेल. सिंकदराबाद-मुंबई (०७०५८) गाडी शनिवार (ता. ५)पासून सिकंदराबादहून दुपारी एक वाजून २५ मिनिटांनी सुटेल. मनमाड, नाशिक रोडला ती थांबेल. तसेच, डाउन मुंबई-सिकंदराबाद (०७०५७) ही विशेष गाडी रविवार (ता. ६)पासून सुरू होईल. कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच या गाड्यांमध्ये प्रवेश मिळेल.