रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा महत्वपूर्ण निर्णय; यात्रेकरूंना मिळणार मोठा दिलासा

नाशिक : मध्य रेल्वे प्रशासनातर्फे यात्रेकरूंच्या सुविधांसाठी अतिरिक्त तीन विशेष प्रवासी गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या मुंबई, नागपूर, पुणे, नागपूर, अहमदाबाददरम्यान चालविण्यात येणार असून, संपूर्ण आरक्षित असणार आहे. 

अशा आहे वेळा....

मुंबई-नागपूर विशेष गाडी दररोज २१ जानेवारीपासून मुंबईहून दररोज १४. ५५ वाजता रवाना होईल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी ५.४५ वाजता पोचेल. अप नागपूर-मुंबई विशेष गाडी २० जानेवारीपासून नागपूरहून दररोज २१.१० वाजता रवाना होईल आणि मुंबईला दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोचेल. देवळाली, नाशिक, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा येथे थांबा आहे. नागपूर- अहमदाबाद विशेष गाडी साप्ताहिक २० जानेवारीपासून नागपूरहून दर बुधवारी ८.१५ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी अहमदाबादला ००.३५ वाचता पोचेल. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

डाउन अहमदाबाद- नागपूर विशेष गाडी २१ जानेवारीपासून अहमदाबादहून दर गुरुवारी १८.३० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी नागपूरला १०.२५ वाजता पोचेल. नागपूर- पुणे सुपरफास्ट एसी विशेष गाडी १९ जानेवारीपासून नागपूरहून दर मंगळवार, शुक्रवार, रविवारी १८.०० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पुणेला ९.०५ वाचता पोचेल. डाउन पुणे- नागपूर एस.सी. विशेष गाडी २० जानेवारीपासून पुणेहून दर बुधवार, शनिवार, सोमवारी १७.४० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी नागपूरला ०९.१० वाचता पोचेल. बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड या स्थानकावर थांबणार आहे. 

केवळ याच प्रवाशांना परवानगी

केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.  

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच