रेशनकार्ड पोर्टबिलीटी सुरु; धान्यासाठी कुणीच पुढे येईना 

नाशिक : रोजगारानिमित्त स्थलांतर करणाऱ्या कामगारांना देशात कोणत्याही राज्यात, कोणत्याही ठिकाणी धान्य घेणे शक्य व्हावे यासाठी केंद्र सरकारने ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजना सुरु केली. पण वन नेशन वन रेशन योजनेतून धान्याचा लाभ घेणाऱ्या परप्रांतीयांकडून रेशनकार्ड पोर्टबिलिटी सुरु आहे. परंतू, धान्यासाठी प्रतिसाद नाही. 

योजनेला अत्यंत कमी प्रतिसाद

वन नेशन ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेच्या माध्यमातुन कोणताही रेशनकार्डधारक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही राज्यातल्या रेशन केंद्रावरुन धान्य घेऊ शकतो. कोरोना महामारीमध्ये स्थलांतरित कामगार, रोजंदारी मजूर आणि प्रवाशांचे अन्नधान्याअभावी हाल झाले. त्यामुळेच केंद्र सरकारने ही योजना राबवून स्थलांतरितांना दिलासा दिला. पण या योजनेला नाशिक शहरासह जिल्ह्यातही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.परप्रांतातुन नाशिकमध्ये दाखल होणारे कामगार हे या योजनेचा लाभ नाशिक मध्ये घेत नाहीत. या कामगारांचे आई- वडिल हे मुळ गावी राहत असल्याने तेथे 
त्यांना धान्याची गरज भासते. जर या कामगारांनी येथे धान्य घेतले तर त्यांच्या आई-वडिलांना तेथे धान्य मिळत नाही. त्यामुळे या योजनेचा 
उद्देशच सफल होत नसल्याचे दिसत आहे. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेचा लाभ घेण्यास परप्रांतीय उत्सूक नाहीत. त्यांनी इथे रेशनचा लाभ घेतला तर गावी असलेल्या त्यांच्या आई,वडिल यांना त्याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. परजिल्ह्यातील किंवा जिल्ह्यांतर्गत रेशन कार्डाच्या 
पोर्टेबिलिटीच्या सुविधेला मात्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 
- अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप