रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खवय्यांची सुकामेव्याला पसंती; जाणून घ्या दर

नाशिक : शहरातील वाढत्या थंडीने सुकामेव्याची मागणी वाढली आहे. कोरोनाची लागण टाळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढणे आवश्यक आहे. त्यादृष्टीनेही सुकामेव्याच्या खरेदी-विक्री व्यवसायात तेजी आली आहे. लॉकडाउननंतर व्यवसाय सुरळीत होत असल्याने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. डिसेंबरमध्ये ग्राहकांची संख्या वाढण्याची शक्यताही विक्रेत्यांनी व्यक्त केली.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर

काही दिवसांपासून शहरात गारवा वाढून थंडी जाणवत आहे. अशा वातावरणात रोगप्रतिक्रारशक्ती वाढविण्यासाठी नागरिकांकडून मेथीचे लाडू, सुकामेव्याचा शिरा, दुधात बदाम भिजवून खाणे यासारख्या आहारास महत्त्व देत असतात. या सर्व पदार्थांसाठी सुकामेवा गरजेचा असतो. तसेच यंदा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाची लागण लागण टाळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती उत्तम असणे आवश्‍यक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या फळांच्या आहारासह सुकामेव्याचे सेवन करण्याचा सल्ला त्यांच्याकडून दिला जात आहे. अशा दोन्ही कारणांमुळे सुकामेव्याला मागणी वाढली आहे. त्यानिमित्ताने सराफ बाजार, बोहोरपट्टी भागात सुकामेव्याची दुकाने थाटली आहेत.

ग्राहकाची संख्या वाढण्याची शक्यता

सुकामेव्याच्या खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी समाधानाची बाब म्हणजे बदाम, काजू , खोबरेचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घसरले आहेत. किलोमागे बदामच्या दरात २००, काजू १५०, तर खोबरे ६० रुपयांनी कमी झाले आहे. नागरिकांमध्ये अजूनही कोरोनाची भीती असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत ग्राहकांची संख्या कमी आहे. येत्या काही दिवसांत ग्राहकाची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे आठ महिने व्यवसाय बंद होते. त्यामुळे व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. थंडीच्या दिवसात मेव्याची खरेदी वाढत असल्याने आठ महिन्यांत झालेल्या नुकसानपैकी काहीसे नुकसान भरून निघण्याची शक्यताही विक्रेत्यानी व्यक्त केली.

सुकामेव्याचे दर
पदार्थ दर (किलोमध्ये)

कोबरे १८०
पिवळी खजूर १८०
काळी वाळलेली खजूर २००
काजू ७२०
बदाम ६००
अक्रोट (आख्खे) ७००
अक्रोट (फोडलेले) १०००
अंजीर (लहान) ६५०
अंजीर (मोठे) ७२०
डिंक २००
गोडंबी ७२०
मेथी १००

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

सुकामेव्याच्या काही पदार्थांचे दर घसरले आहेत. त्याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. १ डिसेंबरनंतर ग्राहकांच्या संख्येत अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. - मयूर उग्रेज (विक्रेता)

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार