रोलेट जुगार प्रकरण : हजारो तरुणांना नादी लावणाऱ्या कैलास शहाचे आर्थिक व्यवहार रडारवर 

नाशिक : रोलेट ऑनलाइन गेमिंग जुगारात आर्थिक व्यवहाराच्या जाळ्यात हजारो तरुणांना नादी लावून मोठी माया जमविलेल्या कैलास शहा याने या गेमिंगदरम्यान ऑनलाइन परवानग्या तसेच, शासनाचे विविध करविषयक नियम डावलले का, हा विषयही पुढे आला आहे.

कैलास शहाचे आर्थिक व्यवहार रडारवर 

कैलास शहाबाबत ऑनलाइन व्यवहारातील शासकीय कर भरण्याबाबत पोलिसांना विविध यंत्रणांकडे चौकशी करावी लागणार आहे. एकावेळी आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यासह आयटी ॲक्ट,आर्थिक व्यवहारादरम्यान शासनाच्या आर्थिक फसवणुकीचे मुद्दे पोलिस चौकशीच्या रडारवर आहेत.  

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

दोन दिवसांची पोलिस कोठडी

रोलेट ऑनलाइन गेमिंग जुगार प्रकरणातील संशयित कैलास शहा याच्या आर्थिक व्यवहारांची व्याप्ती मोठी असल्याने पोलिसांनी चौकशीसाठी कोठडीची मागणी केली आहे. त्यानुसार त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड