लंडन मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या दोघांचा सहभाग

दीपक लोंढे, ज्योती लोंढे www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
दरवर्षी भारतातून जागतिक मॅरेथॉन स्पर्धामध्ये 300 ते 400 धावपटू सहभागी होतात. हौशी धावपटूंपैकी सिन्नर येथील स्ट्यडर्स कंपनीचे डायरेक्टर दीपक लोंढे, ज्योती लोंढे यांनी नुकत्याच झालेल्या टी. सी. एस. लंडन मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला होता. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी जगातून सत्तावन हजार लोक, 145 विविध देशांतून सहभागी झाले होते. भारतातून या मॅरेथॉनसाठी 247 लोकांनी नोंदणी केली होती.

जागतीक पातळीवर मॅरेथॉन धावण्यासाठी प्रमुख सहा रेसेस आहेत. जे अमेरिकेमध्ये तीन मॅरेथॉन, इंग्लंडमध्ये एक, जर्मनीमध्ये एक आणि जपानमध्ये एक मॅरेथॉन त्यांची नावे या प्रकारे आहे. शिकागो मॅरेथॉन, टी. सी. एस. न्यूयॉर्क मॅरेथॉन, बॉस्टन मॅरेथॉन, टी.सी.एस. लंडन मॅरेथॉन, बर्लीन मॅरेथॉन आणि टोकियो मॅरेथॉन या सहाही मेरेथॉन जगातील सर्वात उत्कृष्ट आणि कमीत कमी 50 हजार लोक या प्रत्येक मॅरेथॉनमध्ये धावतात. यामध्ये जगातील विविध हौशी धावपटूंचा सहभाग असतो. गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये हौशी धावपटूंचे प्रमाण वाढत असून त्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. 23 एप्रिल रोजी झालेल्या लंडन मॅरेथॉनमध्ये सिन्नर येथील दीपक लोंढे, ज्योती लोंढे यांनी सहभाग घेतला होता. प्रत्येकाने व्यायाम करून निरोगी राहावे व कुटुंबालाही व्यायामाचे विविध प्रकार जसे की मॅरेथॉनमध्ये धावण्याचे आवाहन जोडीने केले आहे.

हेही वाचा:

The post लंडन मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या दोघांचा सहभाग appeared first on पुढारी.