लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..

नाशिक : लग्नाची बोलणी उरकली दोन्ही पक्षांचा लग्नाला होकार मिळाला.. घरात लग्नाची जोरदार तयारी देखील सुरु झाली, अगदी आठ दिवसात लग्न सोहळा होणार. पण येणाऱ्या रंगबेरंगी दिवसांचे नवरदेवाचे हे स्वप्न अपुरेच राहिले. लग्नाच्या बेडीत अडकण्यास तयार नवरदेवाच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडल्या... नेमके काय घडले वाचा

प्रकरण काय आहे?

जमिनीच्या वादातून ३० लाख रुपयांची रोकड आणि दहा गुंठे जमिनीची सुपारी मारेकऱ्यांना देऊन रमेश मांडलिक या वृध्दाची काही दिवसांपूर्वी आनंदवली भागातच हत्या करण्यात आली होती. या प्रकराणात पोलिसांनी १३  जणांना अटक केली आहे. त्यामध्ये हत्येचा कट रचणे, हत्येसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणारे यांच्यासह प्रत्येक्ष हल्ला करणाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा

नवरदेवावर मदत केल्याचा आरोप

अटक केलेल्या संशयितांमध्ये ध्रुवनगर येथे राहणाऱ्या सागर शिवाजी ठाकरे (वय २५, रा. गुलमोहर कॉलनी, ध्रुवनगर) या तरुणाचा देखील समावेश आहे. सागर ठाकरे याच्यावर हत्येच्या घटनेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप आहे. हत्येचा कट रचणाऱ्या सचिन मंडलिक आणि इतर संशयितांचा मित्र तो मित्र आहे.

परिसरात चर्चेला उधान

सागर ठाकरेचा विवाह २७ फेब्रुवारीला होणार होता पण त्याच्या गळ्यात लग्नाची माळ पडण्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या  साथीदार मित्रांसोबत तो सध्या पोलिस कोठडीत असून त्यांची मुदत १ मार्च पर्यंत आहे. त्यानंतर या सर्व संशयितांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  ऐन लग्नाच्या दोन दिवस आधी खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात नवरदेवाला अटक झाल्याने परिसरात चर्चेला उधान आले आहे.

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना