लग्नसमारंभा दरम्यान साधली संधी; विवाहात सव्वा लाखाचे ओरबाडले दागिने

नाशिक : शोभा कोकणे या लग्नसमारंभासाठी सराफ लॉन्सला गेल्या होत्या. त्यांचा नातू रस्त्यावर पळाल्याने त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे गेल्या असतानाच चोराने संधी साधली. काय घडले वाचा...

नातू मागे धावता धावता चोराने साधली संधी;

शोभा दत्तू कोकणे (रा. देवळाली कॅम्प) यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या बुधवारी सायंकाळी वडाळा-पाथर्डी रोडवर लग्नसमारंभासाठी सराफ लॉन्सला गेल्या होत्या. त्यांचा नातू रस्त्यावर पळाल्याने त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे गेल्या असताना, इंदिरानगरकडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने मोटारसायकल आली व त्यावर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादीच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचा सोन्याचा पोहेहार व तीन ग्रॅमचे मंगळसूत्र असे एकूण एक लाख ३२ हजार रुपयांचे दागिने ओरबाडून नेले. इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा>> पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या

सव्वा लाखाचे दागिने ओरबाडले 

शहरात सोनसाखळी ओरबाडण्याचे प्रकार सुरूच असून, विवाहाला गेलेल्या महिलेल्या गळ्यातील एक लाख ३२ हजार रुपये किमतीचे दागिने मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने ओरबाडून नेले. वडाळा-पाथर्डी रोडवर बुधवारी (ता. ९) सायंकाळी हा प्रकार घडला.

हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण