लढाई कोरोनाशी! बिटको कोरोना सेंटरच्या प्रवेशद्वारी अनोखी दिवाळी 

नाशिक रोड : महापालिकेच्या बिटको रुग्णालयाच्या कोरोना सेंटरमध्ये शनिवारी (ता. १४) कोरोनाविरोधातील लढाईचे प्रतीक असलेली रांगोळी काढून दिवाळीचे स्वागत करण्यात आले.

आगळीवेगळी दिवाळी

महापालिकेने बिटको रुग्णालयात स्वतंत्र कोविड रुग्णालय उभारले असून, तेथे अनेकांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णासमवेत कोणी राहायला तयार होत नाही; अशा परिस्थितीत रुग्णालयातील डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. रत्नाकर पगारे व त्यांचे सहकारी, कर्मचारी मात्र कोरोना रुग्णांचाय सेवेत सक्रिय आहेत. त्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी नगरसेवक जगदीश पवार यांनी येथील कोरोना रुग्णांसोबत व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. प्रवेशद्वारावर भव्य कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय प्रतिनिधीचे चित्रस्वरूपातील रांगोळी साकारण्यात आली. पवार यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.  

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात