लस घेऊनही आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग; धक्कादायक माहिती समोर

नाशिक : कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने लस आणली. त्यासाठी विविध चाचण्याही झाली. पण तीच लस घेऊन सुध्दा एखाद्याला कोरोना संसर्ग झाला तर? ही अतिशय गंभीर घटना नाशिकमध्ये घडली आहे. लस घेतली म्हणजे तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होणारच नाही, अशा भ्रमात राहणे किती चुकीचे ठरू शकते. हे या निमित्ताने उघड झाले आहे.

लस घेऊन सुध्दा आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग
कोरोना विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या लसीकरणाला जिल्ह्यात सुरुवात झाली असून, आरोग्य कर्मचाऱ्यांचाही त्यास प्रतिसाद वाढतो आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील केंद्रावरही लसीकरणाला १०० टक्के प्रतिसाद मिळतो आहे. मात्र नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एका आरोग्य कर्मचाऱ्याने लस घेऊनही आठ दहा दिवसांतच त्याचा कोरोना निदान चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेणे अनिवार्य आहे. त्याशिवाय कोविडला प्रतिबंध करणारी रोग प्रतिकारशक्ती शरीरात तेवढ्या प्रमाणात तयार होत नाही. त्यामुळे खबरदारी व सुरक्षेच्या नियमांचे पालन हाच त्यावर प्रभावी उपाय आहे. लसीचा दुसरा डोस घेतल्याशिवाय कोविड विरोधातील प्रतिकारशक्ती वाढत नाही हे खरे असले तरी लसीकरणानंतरही सुरक्षाविषयक नियमांचे पालन करणे तेवढेच आवश्यक असल्याचे या प्रकारामुळे अधोरेखित झाले आहे.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

असा झाला कोरोना
सिव्हिल हॉस्पिटलमधील एका फार्मासिस्टला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. २० जानेवारी रोजी त्यांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली होती. दुसरी लस घेण्यास काही दिवसांचा अवकाश असताना हा कर्मचारी निकटवर्तीय कोविड बाधितांच्या संपर्कात आला. त्यामुळे त्यांनीदेखील करोना निदान तपासणी करवून घेतली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. फारशी लक्षणे व त्रास नसल्याने ते घरीच उपचार घेत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच