लहान मुलं आवडीने खातात तो ‘मसाला पोंगा की प्लॅस्टिक’? आरोग्यासाठी घातक; पाहा VIDEO 

सिडको (नाशिक) : खाऊ म्हटलं की, लहान मुले त्याचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता मनमुरादपणे आस्वाद घेत आनंद लुटण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. परंतु, या खाऊचे पदार्थ खाताना काळजी घ्यावी, असे आवाहन वारंवार पालक वर्गही नेहमी करतात. परंतु, ऐकतील ती मुले कसली. अशाच प्रकारे सिडकोतील सामाजिक कार्यकर्ते उत्तम काळे बाजारात असलेले नवनवीन पद्धतीचे ‘मसाले पोंगे’ शरीरासाठी कसे घातक आहेत, याचे प्रात्यक्षिक करून जनजागृती करताना दिसत आहे. 

 

लहान मुलं आवडीने खाणारा हा मसाला पोंगा की प्लॅस्टिक?
प्लॅस्टिकयुक्त मसाले पोंगे असल्याचा दावा करत ते कसे जळतात, हे लहान मुलांनाही सांगताना दिसून येतात. तसे बघितले तर हे काम अन्न व औषध प्रशासनाचे आहे. परंतु, या प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी केवळ तक्रार येण्याची वाट बघत असतात. असाच आतापर्यंतचा अनुभव आहे. शासनाने नेमून दिलेल्या व जबाबदारी असलेल्या या सेवकांनी जर वेळोवेळी आपली जबाबदारी इमानेइतबारे पार पाडल्यास मानवाच्या शरीराला धोकादायक ठरतील असे हे खाद्यपदार्थ मुळात बाजारात येणारच नाही, असा सवाल नागरिक विचारताना दिसत आहे. 

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना