नाशिक : पुढारी वृत्तसेवा- फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, गुगल व स्नॅपचॅट या सोशल मीडिया माध्यमांवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या ३३ खातेधारकांविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रतीक पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
सरकारच्या दि नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अॅण्ड एक्सप्लोइटेड चिल्ड्रेन आणि नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो यांच्याकडून अल्पवयीन मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचाराबाबत कडक धोरण राबवण्यात येते. त्यात बालकांचे अश्लील छायाचित्र काढणे, चित्रीकरण करणे, व्हिडिओ बाळगणे किंवा त्यांचा प्रसार करणे हा माहिती तंत्रज्ञान कायदा-२०००, कलम ६७ (ब) प्रमाणे गुन्हा आहे. अशा प्रकारचा अपराध करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सायबर पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्याच्या सायबर पोलिसांना मिळालेल्या सीडीमधील टीपलाइनमधील इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप व इतर माध्यमांवरील खातेधारकांनी स्वत:च्या खात्यावरून अल्पवयीन बालकांचे अश्लील व्हिडिओ जानेवारी ते जून २०२१ या कालावधीत सोशल मीडियावरून व्हायरल केले होते. त्यामुळे नाशिक सायबर पोलिसांनी संबंधित सोशल मीडियावरील खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
केंद्रीय यंत्रणेची नियमित गस्त
अल्पवयीन मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तसेच त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ, छायाचित्र व्हायरल होऊ नये यासाठी केंद्रीय यंत्रणा नियमित सायबर गस्त घालत असतात. त्यानुसार खातेधारकांची माहिती मिळाल्यानंतर संबंधित राज्याच्या पोलिसांना ही माहिती कळवली जाते. त्यानुसार राज्याकडून सायबर पोलिसांकडे ही माहिती पाठवल्यानंतर कारवाई केली जाते.
हेही वाचा :
- Rakul Preet Singh Marriage : लग्नासाठी रकुल प्रीत सिंग -जॅकी भगनानी गोव्यात दाखल (Video)
- Sunny Leone : सनी लिओनीच्या बनावट ओळखपत्राने गोंधळ
- Nashik : जलपर्णीचा जाच; जलचर प्राणी, पक्ष्यांना त्रास
The post लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल, ३३ खातेधारकांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.