लाचखोर कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना सापडला रंगेहाथ

म्हसरूळ (नाशिक) : महानगरपालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील घरपट्टी विभागाच्या लिपिकाला १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी पकडले.

संजय पटेल असे संशयित लिपिकाचे नाव असून ताे घरपट्टी-नळपट्टी विभागात कार्यरत आहे. नळजाेडणी मिळवण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला हाेता. मात्र पटेल याने ३५ हजारांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली हाेती. त्यानुसार रंगपंचमीच्या दिवशी लिपिक पटेल याने १० हजारांची लाच घेतली. मात्र, सापळा रचलेलल्या पथकाने पटेल याला रंगेहाथ पकडले. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी