लाल कांद्याचे भाव स्थिरावलेले तर‌ उन्हाळ कांद्याची घसरण कायम 

नाशिक : कांद्याच्या भावातील घसरणीची समस्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नव्याने दाखल होणाऱ्या लाल पोळप्रमाणेच उन्हाळ कांद्याची ही स्थिती जिल्ह्यातील बाजारपेठांमधून पाहायला मिळते. घसरलेल्या भावाच्या अनुषंगाने लाल कांद्याचे भाव मंगळवारी (ता. २४) स्थिरावलेले राहिले. पण उन्हाळ कांद्याच्या भावातील घसरण सुरू राहिली. दिवाळीपूर्वी क्विंटलभर कांद्याला सरासरी चार हजार रुपयांहून अधिक भाव मिळत होता. 

लाल कांद्याचे भाव स्थिरावलेले अन्‌ उन्हाळची घसरण कायम 
उन्हाळ कांद्याची अमाप आवक झालेल्या सटाणा बाजार समितीत सोमवारी (ता. २३) क्विंटलला सरासरी तीन हजार ३५० रुपये असा भाव मिळाला होता. मंगळवारी इथे भावात क्विंटलला शंभर रुपयांनी वाढ झाली होती. त्याच वेळी उमराणेमधील उन्हाळ कांद्याचे भाव एका दिवसामध्ये क्विटंलला ९०० रुपयांनी वाढून तीन हजार ८०० रुपयांपर्यंत पोचले होते. मात्र दोनशे रुपयांनी घसरण होऊन चांदवडमध्ये तीन हजार, तर मनमाडमध्ये दोन हजार ८०० रुपये क्विंटल या सरासरी भावाने उन्हाळ कांद्याची मंगळवारी विक्री झाली. लासलगावमध्ये पन्नास रुपयांची घसरण होऊन तीन हजार ३५० रुपये क्विंटल या सरासरी भावाने उन्हाळ कांदा विकला गेला. पिंपळगावमध्ये तीन हजार ९५१, तर देवळ्यात तीन हजार ४०० रुपये क्विंटल हा सरासरी भाव कायम राहिला. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

पिंपळगावमध्ये चार हजार ३०० रुपये 
पिंपळगाव बसवंतमध्ये लाल कांद्याला मंगळवारी चार हजार ३०१ रुपये क्विंटल असा सरासरी भाव मिळाला. सोमवारी (ता. २३) चार हजार १०१ रुपये क्विंटल असा सरासरी भाव मिळाला होता. लाल कांद्याला देवळ्यात दोनशे रुपयांनी अधिकचा म्हणजे चरा हजार रुपये क्विंटल, तर सटाण्यात १०० रुपयांनी अधिक म्हणजे तीन हजार ७५० रुपये क्विंटल असा सरासरी भाव राहिला. मनमाडमध्ये साडेतीन हजार व लासलगावमध्ये तीन हजार ८०० रुपये क्विंटल असा सरासरी भाव कायम राहिला होता. दिवाळीनंतर पूर्ण क्षमतेने सर्वत्र कांद्याचे लिलाव सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला सोशल मीडियातून पिकलेल्या अफवांमुळे शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २३) कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आणला. परिणामी, भाव कोसळले होते. त्यानंतर आज स्थिती काय राहील, याबद्दलची उत्सुकता सर्वांना होती. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ