लाल कांद्याच्या भावात घसरण; शेतकऱ्यांना आश्‍चर्याचा धक्का!

नाशिक : नवीन लाल कांद्याचे भाव क्विंटलला अडीच ते दोन हजार ७०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. गेल्या आठवड्याच्या सुरवातीला हाच भाव साडेतीन हजारांपर्यंत होता. पण आठवड्याच्या अखेरीस पुन्हा भावातील घसरण सुरू झाली.

निर्यातीऐवजी देशात कांदा विक्रीसाठी पाठवण्यावर लक्ष

गेल्या आठवड्यात क्विंटलभर कांद्याच्या भावात ३०० ते ६०० रुपयांची घसरण झाली. सुरतमध्ये शनिवारी (ता. ६) तीन हजार, तर बेंगळुरूमध्ये स्थानिकला तीन हजार व पुण्याच्या कांद्याला तीन हजार ४०० रुपये क्विंटल असा भाव मिळाला होता. अलाहाबादमध्ये तीन हजार १२५, लखनौमध्ये तीन हजार रुपये क्विंटल या भावाने घाऊक बाजारात कांद्याची विक्री झाली होती. देशांतर्गत मागणी असल्याने व्यापाऱ्यांनी निर्यातीऐवजी देशात कांदा विक्रीसाठी पाठवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

घसरणीने शेतकऱ्यांना आश्‍चर्याचा धक्का

गुजरात, कर्नाटक, पश्‍चिम बंगालमधून नवीन कांद्याची आवक होईपर्यंत नाशिकचा कांदा ‘भाव’ खाणार अशी स्थिती निर्माण झाली असताना भावातील घसरणीने शेतकऱ्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांदा उत्पादक नसलेल्या राज्यांमधून क्विंटलभर कांद्याचा भाव साडेतीन ते चार हजार रुपयांच्या आसपास असल्याचे चित्र गेल्या आठवड्यात राहिले. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 

बाजारपेठ ६ फेब्रुवारी ५ फेब्रुवारी ४ फेब्रुवारी ३ फेब्रुवारी २ फेब्रुवारी १ फेब्रुवारी 
येवला २ हजार ६०० २ हजार ५०० २ हजार ८५० ३ हजार २५० - ३ हजार २०० 
लासलगाव २ हजार ८५१ ३ हजार १ ३ हजार २६० ३ हजार ३५१ ३ हजार ५०० ३ हजार २०० 
चांदवड २ हजार ९०० २ हजार ७०० ३ हजार २५० ३ हजार ४०० ३ हजार २५० ३ हजार ५०० 
मनमाड २ हजार ९०० २ हजार ९०० ३ हजार २०० - ३ हजार २०० ३ हजार २०० 
पिंपळगाव २ हजार ८५१ २ हजार ९०० ३ हजार १११ ३ हजार ४५१ ३ हजार ४०१ ३ हजार २०१ 
मुंगसे - २ हजार ८५० ३ हजार ४२५ ३ हजार २५० ३ हजार ५५० ३ हजार ४५० 
उमराणे - २ हजार ९०० ३ हजार ४०० - - ३ हजार ३००