लासलगावला कांद्याच्या दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

लासलगाव ( जि.नाशिक) : राजस्थान, मध्य प्रदेशात नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने राज्यातील जुन्या उन्हाळ कांद्याच्या मागणीत घट होत असल्याने लासलगाव बाजार समिती बुधवार (ता.२५)च्या तुलनेत गुरुवारी (ता.२६)कमाल बाजार भावात ७१५ रुपयांची घसरण होत, तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत एक हजार २०० रुपयांची मोठी घसरण होत कांद्याचे बाजारभाव चार हजारांच्या आत आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमाल तीन हजार ५१२ रुपये, किमान एक हजार १०० रुपये, तर सर्वसाधारण तीन हजार रुपये इतका प्रतिक्विटंलला बाजारभाव मिळाला, तर लाल कांद्याला कमाल साडेचार हजार रुपये, किमान अडीच हजार रुपये, तर सर्वसाधारण तीन हजार २५० रुपये इतका बाजारभाव मिळाला आहे.

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

दुहेरी समस्येत कांदा उत्पादक शेतकरी

कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आयात-निर्यात धोरणाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे रोज कांद्याच्या बाजारभावात चढ-उतार होत असल्याने नवीन लाल कांद्याचे आणि जुन्या उन्हाळ कांद्यावरील झालेला खर्च कसा काढावा आणि कुटुंब कसे चालवावे, अशा दुहेरी समस्येत कांदा उत्पादक शेतकरी अडकला आहे.  

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ