
लासलगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशात कांद्याचे बाजार ठरविणाऱ्या लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला या हंगामातील उच्चांकी प्रतिक्विंटल ५ हजार ८२० रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात कांदा महाग झाल्याने ग्राहकांना ५० ते ६० रुपये किलोने कांदा खरेदी करावा लागत आहे. दिवाळीपर्यंत कांदा दर आणखी वाढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यातील बाजार समितीत ऑक्टोबर महिन्यात लाल कांद्याचे किरकोळ प्रमाणात आगमन झाले असून, त्याला ४४०१ रुपये प्रतिक्विंटल भाव लासलगाव बाजार समितीत मिळाला. कमी पावसामुळे लाल कांदा बाजारपेठेत येण्यास उशीर होणार आहे. उन्हाळ कांद्याच्या दरात 400 ते 500 रुपयांची वाढ होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने जेमतेम उन्हाळ कांदा शिल्लक आहे. शिल्लक कांदा खराब होण्याचे प्रमाण मोठे आहे. मे, जून, जुलैमध्ये अत्यंत कमी दराने शेतकऱ्यांना कांदा विक्री करावा लागला होता. आता चांगला भाव मिळत असला, तरी यातून जेमतेम उत्पन्न खर्च निघू शकेल, अशी परिस्थिती कांदा उत्पादकांची आहे.
या हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप कांद्याचे रोप खराब झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा आवक घटली आहे. पावसाअभावी जिल्ह्यात कांदा लागवड क्षेत्रातही घट झाली आहे. त्यामुळे आगामी कांदा आवक लक्षात घेता, शेतकऱ्यांनी टप्प्या-टप्प्याने उन्हाळ कांद्याची विक्री बाजार समितीमध्ये सुरू केली आहे.
शुक्रवारी (दि. 27) लासलगाव बाजार समितीत ८४० वाहनांतून अंदाजे 10,334 क्विंटल कांदा आवक झाली. त्यात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 2001, जास्तीत जास्त 5820, तर सरासरी 4925
हेही वाचा :
- TET Exam : २०१३ पूर्वीच्या शिक्षकांना मोठा दिलासा! पदोन्नतीसाठी टीईटी अट रद्द
- Asian Para Games | आशियाई पॅरा गेम्समध्ये १०० पदके! हृदय अभिमानाने भरून आले : पीएम मोदी
- Pune University : पुणे विद्यापीठाची अधिसभा ठरणार वादळी
The post लासलगावी कांदा उच्चांकी ५८२० रुपये क्विंटल appeared first on पुढारी.