लासलगाव : पुढारी वृत्तसेवा; येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात चालू आठवड्यात उन्हाळ कांद्याची ३० हजार ९५४ क्विंटल आवक झाली. त्यास किमान १,४०१ रुपये, कमाल ५,२६० रुपये, तर ३,८९४ रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण बाजारभाव मिळाला. याचप्रमाणे लाल कांद्याची ३३ हजार १७८ क्विंटल आवक होऊन त्यास सरासरी ३,९५० रुपये दर मिळाला. कमीत कमी १,२०० रुपये, तर जास्तीत जास्त ४,७४७ रुपये भाव मिळाला.
निफाड उपबाजारातही उन्हाळ कांद्याला सरासरी ४,२०० रुपये भाव मिळाला. या ठिकाणी ७,९०० क्विंटल माल आवक झाला. त्यास १,५०० ते ४,५५२ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. लाल कांद्याची १,३१० क्विंटल आवक होऊन त्यास सर्वसाधारणपणे ४,००१ रुपये भाव मिळाला.
विंचूर उपबाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी ३,६०० रुपये बाजारभाव मिळाला. येथे ३२ हजार ६६० क्विंटल आवक होऊन १,५०० ते ४,७४१ रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात आला. लाल कांद्याची १८ हजार ३११ क्विंटल आवक होऊन सरासरी ४,१०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी-विक्री झाली. 2.000 ते ४,८५२ रुपये या दरम्यान बाजारभाव राहिले.
हेही वाचा :
- INDIA आघाडीबाबत अखिलेश यादव यांचे मोठे विधान, ” पराभवानंतर आघाडी…”
- लातूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे
The post लासलगाव बाजार अंतर्गत आठवडाभरात ७१,५१४ क्विंटल उन्हाळ कांद्याचे लिलाव appeared first on पुढारी.