लासलगाव येथील टपरी मार्केट आगीत भस्मसात

Nashik News

लासलगाव; पुढारी वृत्तसेवा: लासलगाव शहरातील कोटमगाव रस्त्यावरील शिवकमल मंगल कार्यालयासमोरील टपरी मार्केटला आग लागली. आगीची ही दुर्घटना शनिवारी (दि.२८) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. अचानक आग लागल्याने टपरी मार्केट मधील सर्व टपरी धारक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. (Nashik News)

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास लासलगाव शहरातील कोटमगाव रस्त्यावरील शिवकमल मंगल कार्यालयासमोर असलेल्या संपूर्ण टपरी मार्केटला आग लागली. अचानक आग लागल्याने येथील टपरी धारकांचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळेल त्याठिकाणाहून पाणी उपलब्ध करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पिंपळगाव बसवंत व चांदवड येथील अग्निशामक दलाची गाडी दाखल होऊन आग नियंत्रणात आणली. घटना घडताच लासलगाव पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. (Nashik News)

या घटनेची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पंचनामा केला आहे. या सर्व टपरी धारकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच स्थानिक प्रशासनाने तातडीने अग्निशामक गाडीची व्यवस्था करावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लासलगाव व परिसरासाठी अग्निशामक गाडीची मागणी बाजार समितीकडे करणार असल्याचे सरपंच जयदत्त होळकर यांनी सांगितले. (Nashik News)

हेही वाचा:

The post लासलगाव येथील टपरी मार्केट आगीत भस्मसात appeared first on पुढारी.