लॉकडाउनच्या भीतीने बंद दुर्लक्षित; अर्धा दिवस बंद पाळून बंदला प्रतिसाद 

नाशिक : दिल्लीत सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पुकारलेल्या भारत बंदला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. शनिवार (ता. २७)पासून दोन दिवसांचा व त्यानंतरच्या लॉकडाउनच्या भीतीमुळे दुपारनंतर बहुतांश दुकाने पूर्ववत सुरू झाली. 

नाशिक शहरासह नाशिक रोड, पंचवटी व इतर भागात सकाळी काही काळासाठी दुकानदार व्यावसायिक बंदमध्ये सहभागी झाले. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र लॉकडाउनच्या भीतीने लोकच शहरातील विविध भागातील रस्त्यांवर उतरून माल खरेदीसह लॉकडाउनमध्ये अडचण नको म्हणून उतरल्याने व्यावसायिकांनी दुपारनंतर त्यांची दुकाने उघडली. त्या मुळे बंदला पाठिंबा असूनही लॉकडाउनमध्ये अडचण व्हायला नको म्हणून आजचा बंद जास्त प्रभावी नव्हता. नाशिकला किसान सभेचे राज्य सचिव राजू देसले, जिल्हाध्यक्ष भास्कर शिंदे, सरचिटणीस देवीदास बोपळे, जिल्हा संघटक विजय दराडे, उपाध्यक्ष ॲड. दत्तात्रय गांगुर्डे, नामदेव बोराडे, कार्याध्यक्ष प्रा. के. एन. अहिरे, सुखदेव केदारे, मधुकर मुठाळ, किरण डावखर, रमजान पठाण, वित्तल घुले, साधना गायकवाड, शिवराम रसाळ, भाऊसाहेब शिंदे, शिवाजी शिंदे, जगन माळी, शिवाजी पगारे, नामदेव राक्षे आदी बंदसाठी प्रयत्नशील होते. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

केंद्र शासनाने तीन कृषी कायदे व प्रस्तावित वीजबिल कायदा २०२० रद्द करावा, स्वामिनाथन आयोग शिफारशी लागू करा, शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी (ता. २६) आंदोलनाला चार महिने पूर्ण झाल्याने भारत किसान मोर्चाने २६ मार्चला भारत बंदचे आवाहन केले होते. भारत बंदला महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्षासह २०० पेक्षा अधिक शेतकरी, कामगार, संस्था, संघटना जनआंदोलनची संघर्ष समिती भारत बंद यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील होते. 

रविवारी वीजबिलांची होळी 

केंद्र सरकार कोरोना काळात शेतकरी, कामगार, व्यापारीविरोधी कायदे केले आहेत. बँक, एलआयसी, रेल्वे खासगीकरणाविरोधात देशभर रविवारी (ता. २८) शेतकरीविरोधी कायदे, प्रस्तावित वीजबिल कायद्याची होळी करण्यात येणार आहे. तरी गावागावांत होळी करावी, असे आवाहन किसान सभेतर्फे करण्यात आले आहे. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

नाशिक रोडला बंद 

नाशिक रोडला बहुजन शेतकरी संघटनेचे अशोक खालकर, रमेश औटे, बळवंत गोडसे, किसान सभेचे नामदेव बोराडे आदींनी फेरी काढून नाशिक रोड परिसरात आवाहन केले शेतकरीविरोधी काळे कायद्याची होळी करण्यात आली. कोरोनामुळे शनिवार, रविवार बाजारपेठ बंद आहेत. त्यामुळे नुकसान होत असतानाही व्यापारीवर्गाने चार ते सहा तास बंद पाळून शेतकऱ्यांना साथ दिली आहे. पाठिंबा दिला याबद्दल आभार मानण्यात आले.