लॉकडाउनबाबत महापौर-आयुक्तांमध्ये चर्चा; कोविड सेंटर तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश 

नाशिक : कोरोना रुग्णवाढीत देशात पहिल्या दहात असलेल्या नाशिक महापालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाउन करण्याचा विचार सुरू आहे. शहरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कमी पडत असल्याने गुरुवारी (ता. २५) महापौर सतीश कुलकर्णी आणि आयुक्त कैलास जाधव यांच्यात बैठक होऊन त्यात फेरलॉकडाउनबाबत चर्चा झाली. 

शहरात लसीकरण व तपासणी केंद्रवाढ व्हावी, बाधित घराबाहेर फिरत असल्याने त्यांचा इतरांशी संपर्क होऊन रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंचवटीतील मेरीच्या पंजाबराव देशमुख, तपोवन येथील स्वामिनारायण शाळा, समाजकल्याण, ठक्कर डोम इत्यादी ठिकाणी कोविंड सेंटर सुरू करून सुविधा पुरवून कोविड सेंटर तातडीने कार्यान्वित करण्याचे महापौर कुलकर्णी यांनी निर्देश दिले. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

नऊ मोठ्या शहरांमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त

हॉस्पिटलला संपर्क करून रुग्ण ॲडमिट करू शकतील. तसेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडबाबतची ही व्यवस्था वेळच्या वेळी नागरिकांकरिता माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात यावी. भारतामध्ये नऊ मोठ्या शहरांमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे. यात नाशिक शहराचाही समावेश असल्याने गंभीर महापालिका यंत्रणा सक्रिय दिसावी. दंडात्मक कार्यवाही करावी. व्यापारी पेठा, भाजी बाजार आदी ठिकाणी लावलेले अंशतः लॉकडाउन याबाबत पुन्हा नव्याने फेरविचार करण्याचा सूर महापालिका यंत्रणेने आळविला. शुक्रवारी (ता. २६) जिल्हा प्रशासनासमोर हा विषय मांडायचे ठरले. आढावा बैठकीला महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती अध्यक्ष गणेश गिते, सभागृहनेते सतीश सोनवणे आदी उपस्थित होते.  

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ