लॉकडाउनमध्ये रेल्वेला ऑटोमोबाईलची खंबीर साथ! 8 महिन्यांत १४५ रॅक्स लोड

भुसावळ (नाशिक) : मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत १४५ रॅक्स ऑटोमोबाईल लोड केल्या आहेत. मागील संपूर्ण आर्थिक वर्षात ते ११८ रॅक लोड केले होते. त्या तुलनेत रेल्वेने यंदा ऑटोमोबाईल क्षेत्रात अधिक वाहतूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

यंदा अधिक प्रमाणात वाहनांची देश-विदेशात वाहतूक 

भारतीय रेल्वेच्या ऑटोमोबाईल ट्रान्स्पोर्ट वॅगन्सवर त्वरित आणि किफायतशीर वितरण करण्यासाठी महिंद्र आणि महिंद्र, टाटाचे ऑटोमोबाईल मध्य रेल्वेला मिळत आहेत. मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत कार, ट्रॅक्टर, पिक-अप व्हॅन, जीप आदी १४५ रॅक्समधून भारतातील विविध शहरांमध्ये वाहतूक केली आणि बांगलादेशला निर्यातसुद्धा केली आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत भुसावळ विभागातून ८० रॅक्स, पुणे विभागातून ५३ रॅक्स, नागपूर विभागातून नऊ रॅक्स व मुंबई विभागातून तीन रॅक्स मोटारींची वाहतूक झाली. गेल्या आर्थिक वर्षात ११८ रॅकची वाहतूक केली होती. हा व्यवसाय वाढविण्यासाठी मध्य रेल्वेचे मुख्यालय व विभागीय स्तरावरील बिझिनेस डेव्हलपमेंट युनिटने सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे महासंचालक संजीव मित्तल यांनी कौतुक केले. 

बीसीयूमुळे लोडिंगची गती वाढली 

भारतीय रेल्वेने सुलभ मालवाहतुकीसाठी अनेक उपाययोजना आणि मध्य रेल्वेच्या पाचही विभागांत स्थापन केलेल्या व्यवसाय विकास युनिट (बीडीयू)च्या विशेष विपणन प्रयत्नांमुळे ऑटोमोबाईल लोडिंगची गती वाढली आहे. बीडीयूची सक्रिय भूमिका रेल्वेला नवीन व्यवसाय देणाऱ्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करते. यामध्ये एनएमजी रॅक्सच्या फेऱ्यामधील वेळेवर बारीक नजर ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून मालाच्या पुन्हा वाहतुकीस रेक उपलब्ध होईल. लवकरच एनएमजी रॅकमध्ये ऑटोमोबाईल्स (महिंद्र ॲन्ड महिंद्र) जीप व ट्रॅक्टर कळंबोली (केएलएमजी) ते बांगलादेश येथे वाहतूक करण्यास दाखल होतील.

हेही वाचा > सोन्याचे बिस्किट हाती लागले पण श्रीमंत होण्याचे स्पप्न भंगले!

लोडिंग-अनलोडिंग विकसित करण्याची योजना

मध्य रेल्वेने बुटीबोरी येथून एनएमजी लोडिंग वाढविणे, बारामती येथून ऑटोमोबाईल लोडिंग सुरू करणे आणि ऑटोमोबाईल वाहतुकीचे लोडिंग-अनलोडिंग विकसित करण्याची योजना आखली आहे. मध्य रेल्वेने सर्व प्रकारच्या मदतीसाठी वाहन कंपन्या, लॉजिस्टिक कंपन्या आणि लोडर्सचा विस्तार केला असल्याचे सांगण्यात आले.  

हेही वाचा > 'आज कुछ तुफानी' करणे चांगलेच भोवले! तब्बल सहा तासांनंतर भावंडांची सुटका