लॉजवर सापडलेल्या तरुणीच्या मृत्यूचे अखेर रहस्य उलघडले; धक्कादायक माहिती समोर

नाशिक : अर्चना नावाच्या तरुणीचा मृतदेह बुधवारी (ता.१३) हॉटेल सिटी पॅलेसमधील रूम २०२ मध्ये मिळाला होता. अर्चना आडगाव परिसरातील नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थिनी असून, ती मंगळवारी बेपत्ता होती. लॉजवर सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे अखेर रहस्य उलघडले

तरुणीच्या मृतदेहाचे अखेर रहस्य उलघडले

अर्चना आडगाव परिसरातील नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थिनी असून, ती मंगळवारी बेपत्ता होती. कुटुंबीयांनी त्याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती. त्याच दिवशी प्रियकर असलेला संशयित तिला भेटण्यासाठी शहरात आला होता. दोघांनी सीबीएस नजीकच्या हॉटेल सिटी पॅलेस येथे मुक्काम केला. या काळात संशयित तन्मय आणि अर्चनात चारित्र्याच्या संशयातून वाद होऊन ही घटना घडल्याचे पुढे येत आहे. वडील सुरेश भोईर यांनी तक्रार दाखल केली आहे.  

हेही वाचा > एकच व्यवहार आणि जर्मनीला उच्च शिक्षण घेण्याचे तरुणाचे स्वप्न क्षणार्धात भंगले! 

प्रियकराला १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी

दरम्यान, हा खून युवतीच्या चारित्र्याच्या संशयातून झाल्याचे तपासात समोर आले आहे. प्रियकराने बेदम मारहाण करीत तिचा गळा घोटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यास न्यायालयाने सोमवार (ता.१८) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तन्मय प्रवीण धानवा (२१, रा. मासवन, जि. पालघर) असे संशयिताचे नाव आहे. भोईसर (जि. ठाणे) येथील अर्चना सुरेश भोईर या तरुणीचा मृतदेह बुधवारी (ता.१३) हॉटेल सिटी पॅलेसमधील रूम २०२ मध्ये मिळाला होता.हॉटेलमध्ये मुक्कामी थांबलेल्या भोईसर येथील तरुणीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताला येत्या १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

हेही वाचा > तरुणाकडून धक्कादायक वस्तू सापडताच पोलीसही हैराण! युवावर्गाला सहज मिळणाऱ्या गोष्टीचा लावणार शोध?