पांढुर्ली (जि.नाशिक) : ऋषिकेश आपल्या वडिलांसोबत आगासखिंड शिवारातील दारणा नदीच्या काठावर कामानिमित्त गेला होता. पण तेव्हा वडिलांनाही नव्हते माहित कि आपल्याच डोळ्यादेखत म्हातारपणाची काठी बनलेल्या लेकाला भडाग्नी द्यावा लागेल. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
२३ वर्षांच्या 'ऋषिकेश'ची अचानक एक्झिट
आगासखिंड(ता.सिन्नर) शिवारातील दारणा नदीच्या काठावर शेतीसाठी पाणी नेण्यासाठी वडिलांसोबत विद्युत जलपरी बसवत असतांनाच ऋषिकेश एकनाथ वीर (वय 23) याचा पाय घसरला व दारणा नदीच्या पात्रात पडला. ही घटना रविवारी (ता.7) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक शेतकरी व पोहणारे यांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. मात्र यश आले नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा शोध घेतला असता दुपारी साडेचारच्या सुमारास घटनास्थळापासून जवळच त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलीस हवालदार रामनाम जाधव यांनी तो पाण्यतुन बाहेर काढल्यानंतर पंचनामा करून चिकित्सा करण्यासाठी सिन्नरच्या पालिका रुग्णालयात नेला.
हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी
पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद
या तरुणाचा मृतदेह घटनेच्या दुसऱ्या दिवशी नदीपात्रात पाण्यावर तरंगतात आढळून आला. सिन्नर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चिकित्सेनंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. चिकीत्सेनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.आगासखिंड येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. हवालदार रामनाम जाधव अधिक तपास करीत आहे.
हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट