नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; वणी – कळवण रस्त्यावरील मांदाणे फाट्याजवळ दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात एकजण ठार झाला. तर तिघे जखमी आहेत.
याबाबत माहीती अशी की, वणी कळवण रस्त्यावरुन दशरथ रघुनाथ पवार ( 50) (रा. गावठा, ता.कळवण हे दुचाकीवरुन जात असताना समोरुन भरधाव वेगात दुचाकी आली व या दोन्ही दुचाकींवरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. काल (दि. 30) सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या अपघातात दशरथ पवार हे ठार झाले. तर समोरुन येणा-या दुचाकीवरील उत्तम विठ्ठल सोनवणे (रा. आसखेडा, ता.चांदवड), सिताराम आनंदा गांगोडे व अंबादास सिताराम गांगोडे (दोघे रा.पिंपळपाडा ता.दिंडोरी) हे तिघे जखमी झाले आहेत. अपघाताचा गुन्हा वणी पोलिसांत दाखल करण्यात आला असून जखमींवर उपचार सुरु आहेत.
The post वणी-कळवण रस्त्यावर दुचाकींचा अपघात; एक ठार, तीन जखमी appeared first on पुढारी.