वणी सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात

वणी सकल मराठा समाज

अनिल गांगुर्डे

वणी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यात मोठे आंदोलन सुरू झाले आहे. वणी शहरातील व परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने वणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरुवात करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून उपोषणास सुरुवात करण्यात आली. (Maratha Reservation Agitation ) वणी शहरातील सर्व समजाच्या बांधवांनी या उपोषणास पाठींबा दर्शविला आहे. यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, अशा घोषणाही देण्यात आल्या. (Maratha Reservation Agitation)

मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देत हे उपोषण करण्यात येत आहे. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सांगण्यात येत आहे. साखळी उपोषणाची सुरुवात बाळासाहेब घडवजे, भास्कर पाटील, सचिन कड, प्रविण गायकवाड, सचिन पवार यांनी केली.

या उपोषणास पाठींबा देण्यासाठी इतर समाज बांधवांनी हजेरी लावली होती. यावेळी सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, महेंद्र बोरा, सपोनि निलेश बोडखे, प्रशांत कड, राकेश थोरात, किरण गांगुर्डे, कैलास धुम, कैलास मवाळ, जमीर शेख, सुनील बर्डे, डॉ. लक्ष्मण साबळे, अमोल देशमुख, विशाल कड, भरत शिरसाठ, सचिन गणोरे यावेळी उपस्थित होते.

The post वणी सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात appeared first on पुढारी.