वनविभाग सुस्त बिबटया मस्त! वृध्द महिलेवर दिवसा हल्ला; ग्रामस्थ भयभीत

तळवाडे दिगर (जि.नाशिक) : गेल्या आठवड्यातच किकवारी येथील वाघदर शिवारात दोन व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतांनाच आणखी एका आदिवासी महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली.

आणि महिलेने केला आरडाओरडा...

वटार येथील तळवाडे रोड लगत आदिवासी महिला (ता,14) सायंकाळी 6:45 अंगणात बसली होती. भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने चक्क महिलेवरती हल्ला चढवत डोक्याला पंजा मारून जखमी केले, महिलेने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला व महिलेचे प्राण वाचले, तात्काळ घटनास्थळी विरगावं आरोग्य केंद्राची एब्युलन्स आरोग्य सेवक राजेंद्र खैरनार यांनी उपलब्ध करून देत लगेच सटाणा आरोग्य केंद्रात पुढील उपचारासाठी दाखल केले.

पशुधन पुन्हा धोक्यात
गेल्या एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असून दररोज शेतकऱ्यांच्या दुभती जनावरांवर ताव मारत आहे. दररोजच सायंकाळ पासुनच कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्याला बिबट्या दर्शन देतो. पुन्हा एकदा ग्रामस्त भयभीत झाले असून पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. दरवर्षी ह्या परिसरात बिबट्याचा वावर असतो, येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुधाची जनावरेही मोठ्या प्रमाणात आहेत. पण पुन्हा पुन्हा बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. 

वनविभाग सुस्त बिबटया मस्त
गेल्या सहा महिन्यात सहा ते सात वेळा हल्ले करून 20 ते 25 निष्पाप मुक्या प्राण्यांचा बळी गेला. अनेक दिवसापूर्वी सावतावाड़ शिवरात बिबट्याचा वावर आहे. वनपाल उडवा उडवीचे उत्तर देऊन वनपाल आपल्या अंगावरचे काम झटकत असतात, अस वाटतंय वनविभाग सुस्त बिबटया मस्त अस नागरिकांना वाटतंय, वनपालांच्या कृपेने परिसरात अवैद्य वृक्ष तोड होते तेव्हा वनपाल लक्ष्य घालतात, मग बिबटयाचा हल्ला होतो तेव्हा कुठे जातात हा सवाल उपस्थित होत आहे.

रात्र जागून काढावी लागतेय.

सावंतवाडी परिसरात बिबट्याचा बऱ्याच दिवसापासून वावर असून दोन  तीन शेतकऱ्याना मुक्त दर्शनही दिले आहे. दरवर्षी पाण्याचा शोधात येथे बिबट्या येतो व् पाळीव प्राण्याणवर ताव मारतो. येथे लपन्यासाठी मोठी काटेरी जुड़पे आहेत. त्याचा फायदा घेत बिबट्या आपले काम फत्ते करुन घेतो". मेंढपाळ तर दर वर्षी जेरिस आले असून दरवर्षी 10 ते 12 मेँढ़या बळी द्याव्या लागत आहेत. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुग्ध व्यवसायही शेतीला जोड़धंदा म्हणून करतो. परिसरात बिबट्याच्या वावर असल्यामुळे रात्र ही जागून काढावी लागत आहे.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

बऱ्याच दिवसापासून आम्हाला शेतात बिबटे मोकळे दिसतात, जनावरांना चारा कापण्यासाठी शेतात जाता येत नाही आज अनेक संकटाना तोंड देऊन शेती व्यवस्था सुरळीत ठेवली आहे त्यात अशी हानी होत राहिली तर आम्ही काय करायचे आज माझ्या आई वरती हे संकटआले, उद्या कोणावरहि येऊ शकते त्यासाठी वनविभागने झोपेतुन झागे होऊन तातडीच्या उपाययोजना कराव्यात.-कारभारी पवार, शेतमजूर वटार

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ
गेल्या अनेक दिवसांपासून वटार व परिसरात बिबट्या मोकाट फिरत असून अनेक शेतकऱ्यांना मुक्त दर्शन देत आहेत, माझ्या शेतात बिबट्याचा वावर आहे दररोज फटाके फोडून शेतात कामे करावी लागत आहेत,गडी माणसे कामाला येत नाहीत. वनविभाच्या ऑफिसशी संपर्क साधला असता आमची माणसे येऊन बिबट्याला पकडतील असे सांगून आमची समजुत काडून दिली जाते. पण कोणीही फिरून पाहत नाही. असच चालत राहील तर आम्ही शेती करायची कशी, मला तर असं वाटतंय लवकरच बिबट्या मोठे भक्ष्य करेल व वनविभाग फक्त पंचनामा करायला येईल असं वाटतंय.