वयाची सत्तरी, पतीचा मृत्यू अन् आजीबाईंची कुटुंबाचं पोट भरण्यासाठी झुंज 

सिडको (नाशिक) : छोट्याशा झोपडीत आजी व त्यांचे कुटुंब गुजराण करत आहे. त्यांना दोन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. पतीच्या मृत्यूनंतर त्या वाटेल ते काम करून कुटुंबासाठी राबत आहेत. 

१५ वर्षांपासून कुठलीही तक्रार न करता मोलमजुरी
एकीकडे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियासह सर्वत्र महिलांवर अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दुसरीकडे मात्र आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी आजीबाई १५ वर्षांपासून अथकपणे न थकता, कुठलीही तक्रार न करता मोलमजुरी करत आहेत. पतीच्या निधनानंतर १५ वर्षांपासून वयाच्या ७० व्या वर्षीदेखील एखाद्या तरुण-तरुणींना लाजवेल, अशा जोमात काम करणाऱ्या वृद्धेचे खऱ्या अर्थाने परिसरात कौतुकाचा वर्षाव होत असून, महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘ती’ शुभेच्छांच्या हक्कास खऱ्या अर्थाने पात्र ठरत आहे. दिंडोरी तालुक्यातील छोट्याशा खेडेगावातील विठाबाई राऊत पंधरा वर्षांपासून सिडकोतील बडदेनगर येथे छोट्याशा झोपडीत गुजराण करत आहे. त्यांना दोन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. पतीच्या मृत्यूनंतर त्या वाटेल ते काम करून कुटुंबासाठी राबत आहेत. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

त्या एक आदर्श महिला
वर्षभर साठवलेले पैशांचे पोटले त्या दर वर्षी आपल्या गावाकडे जाऊन गावात राहत असलेल्या पोटच्या मुलांना देतात. त्यातून मुलांबद्दल असलेल्या त्यांच्या या पुत्रप्रेमाची कहाणी संपूर्ण गाव कौतुकाने चर्चिली जाताना दिसते. मुलांनी सांगूनही त्या गावाकडे राहत नाहीत. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कुटुंबासाठी काहीतरी करण्याची त्यांची एकाकी लढत पाहून त्यांच्या कुटुंबातील व गावातील सदस्यांसाठी त्या एक आदर्श महिला म्हणून गणल्या जातात. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते, अशी त्यांची आदर्श विचारसरणी या महिला दिनानिमित्त बघायला मिळते. वयाच्या ७० व्या वर्षीदेखील त्या आठ ते नऊ तास काम करतात. त्यामुळे मालक वर्गाचीही त्यांच्याबाबत कुठल्या प्रकारची तक्रार नसते. जोपर्यंत जिवात जीव आहे, तोपर्यंत काम करणार, असे त्या आत्मविश्वासाने सांगतात. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

यांचाही व्हावा गौरव... 
एकीकडे महिला दिन साजरा होत असताना दुसरीकडे अशा आदर्शवत महिलांचादेखील शासनाने, समाजाने व महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेने कुठेतरी विचार केला पाहिजे, असे प्रामाणिक मत आजच्या महिला दिनानिमित्त व्यक्त केल्यास वावगे ठरणार नाही. खऱ्या अर्थाने अशा महिलांनाही महिला दिनाच्या शुभेच्छा मिळाव्यात हाच यामागील उदात्त हेतू आहे.