सर्वतीर्थ टाकेद, (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक येथे आठ दिवसांपूर्वी शेतकरी शिवाजी चौरे यांच्या शेतावरील दोन श्वान व आतापर्यंत सात शेळ्या फस्त केल्याची घटना घडली होती. या मुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत होती.
बिबट्या पाहण्यासाठी गर्दी
इगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक ,फळविहीरवाडी,चोराईवाडी,येथे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अनेक हल्ल्यांमध्ये शेळ्या, श्वान, तसेच मानवी हल्ले चढवत जखमी केल्याच्या घटना घडल्या असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी दिवसादेखील शेतीची कामे जीव मुठीत धरून करत आहे. मंगळवारी (ता.६) पहाटे भक्ष शोधण्यासाठी आलेली दोन ते अडीच वर्षाची बिबट्या मादी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. सदर बिबट्या ही दोन ते अडीच वर्षाची मादी असून जेरबंद झाल्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडत वनविभागाचे आभार मानले.
परिसरात अजून बिबट्या असल्याचा अंदाज
परिसरात अजूनही एक मादी व तीचे पिल्ले असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी आर. पी. ढोमसे, वनपरिमंडळ अधिकारी डी. एस. ढोन्नर, वनरक्षक एस. के. बोडके, एफ. झेड. सय्यद, आर. टी. पाठक, बी. एस. खाडे, एम. जे. पाडवी, सरपंच संतू साबळे, ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम कातोरे, वन कर्मचारी भोरू पेढेकर, दशरथ निर्गुडे, भरत धोंगडे, धोंडीराम पेढेकर आदींसह वन कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी