वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ‘नाशिक’ चा डंका! अल्पावधीत उद्योग भरभराटीला

नाशिक :  नाशिक हे देशाचे वाईन कॅपीटल म्हणून ओळखल्या जाण्यामागची गेल्या दशकातील वाटचाल अतुलनीय आहे. देशातील सर्वांत जास्त वाईनरी कंपन्यां असल्याने वाईन कॅपिटल अशी नवी ओळख नाशिक जिल्ह्याने निर्माण केली आहे. अल्पावधीत वाईन उद्योग भरभराटीला येण्यामागे येथील भौगोलिक वातावरण आणि पूरक सोयी सुविधा हे प्रमुख कारण आहे. 

अल्पावधीत वाईन उद्योग भरभराटीला! 

जिल्ह्यात आतापर्यंत ३५ वाईनरी आहेत. त्यांची सुमारे १ कोटी लिटरपर्यंत वाईन उत्पादनाची क्षमता आहे. त्यातील सुमारे ५० लाख लिटर वाईन्स भारतात विकली जाते. तर ७ लाख लीटरपर्यत वाईन निर्यात होते. १९९९ ते २००९ या दशकात जिल्ह्यात ३५ वाईनरी सुरू झाल्या. २० हजार लिटर ते ५० लाख लिटरपर्यंत वाईन्स निर्मितीची क्षमता या वाईनरीत आहेत. महाराष्ट्र द्राक्ष प्रक्रिया उद्योग धोरणामुळे हे घडले. २००१ ला द्राक्ष प्रक्रिया जाहीर होण्यापूर्वी नाशिकला फक्त पिंपेन को-ऑपरेटिव्ह लि. आणि सामंत सोना वाईन्स लि या दोनच वाईनरी होत्या.

May be an image of text that says 'सकाळ कंपनी ठिकाण सह्याद्री व्हॅली वाईनरी प्रा. लि. इंडिया फूड कंपनी प्रा. निफाड उत्पादन उत्पादनक्षमता क्षमता 50 लाख लिटर विंचूर सनमिरा वाईनरी प्रा लि. 5 लाख लिटर बालरवी वाईनरी कंपनी प्रा. विंचूर विंचूर लाख लिटर क्युरी वाईनरी लि. 6 लाख 25 हजार लिटर वाईन्स ओझरमीग 4 लाख 60 हजार लिटर दिंडोरी दिंडोरी लाख 50 हजार लिटर डि'ओरी वाईनरी प्रा. योर्क वाईनरी व्हॅलीडेविनप्रा.लि. रेड विंगजस वाईनरी प्रा. लि. 10 लाख 50 हजार लिटर दिंडोरी 50 हजार लिटर दिंडोरी 2 लाख लिटर दिंडोरी 20 हजार लिटर'

....तर जागतिक स्तरावर करेल ओळख निर्माण
नाशिकच्या वाईन उद्योगातील भरारीमुळे भारतात उच्च प्रतीची वाईन निर्माण होते हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता भारतीय वाईन उद्योगांत विदेशी गुंतवणूक व्हावी, वाईन पर्यटन वाढावे आणि रिसोर्टस्‌ हा आता प्रमुख उद्योग होण्याच्या दिशेने येथील वाईन-यांचे व्यवस्थापन सुरु झाले आहे. 

May be an image of text that says 'सकाळ कंपनी प्रथमेश वाईन्स प्रा. लि. ठिकाण निफाड विन्टेज वाईन्स उत्पादन क्षमता 50 लाख लिटर निफाड इंटनव्ह्यु वाईनरी प्रा. लि. रेनेशान्स वाईनरी प्रा. प्रा.लि. 5 लाख लिटर नाशिक लाख लिटर ओझर मिग. विकास वाईनरी लि. 6 लाख 25 हजार लिटर दिंडोरी छाया वाईनरी प्रा. 4 लाख 60 हजार लिटर दिंडोरी सिम्मा वाईनरीज प्रा. लि. सित्नर लाख 50 हजार लिटर 10 लाख 50 हजार लिटर दिंडोरी पेरनोड रिकार्ड इंडिया प्रा. टेरोर इंडिया वाईनरीज टेरोरडंडियावाईनरीजप्रा.लि. प्रा. वेनुस सेलेर वेनुससेलेरप्रा.लि. प्रा. 50 हजार लिटर इगतपूरी दिंडोरी 2 लाख लिटर 20 हजार लिटर'

१२ वर्षाची वाईन उद्योगाची वाटचाल

शंभरात वाईन्सची विक्री वाढू लागली आहे. जिल्ह्याच्या वाईन उद्योगाची वाटचाल अवघी १२ वर्षाची आहे. वाईनला जागतिक मार्केट उपलब्ध होउ शकल्यास आणि पंचतारांकित हॉटेलांमध्ये नाशिकच्या भारतीय वाईन्सला जागा मिळाल्यास अल्पावधीत नाशिकची वाईन जागतिक स्तरावर स्वताची ओळख निर्माण करु शकेल. अशा स्थितीत नाशिकचा वाईनरी उद्योग आहे.

No photo description available.

हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..

विदेशी पाहुण्यांचे या वाईनरी आकर्षण

नाशिकमध्ये धोरण जाहीर झाल्यानंतर ३३ वाईनरी प्रकल्प उभारले गेले. नाशिकला व्यवसायानिमित्ताने येणा-या विदेशी पाहुण्यांचे या वाईनरी आकर्षण बनल्या आहेत. तसेच मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नागपूर आणि कोकणातून येणारे उद्योजक तसेच येथील व्यावसायिकही नाशिकच्या वाईन उद्योगांना भेटी देत, वाईन व फुडचा आस्वाद घेऊ लागले आहेत.

May be an image of text that says 'सकाळ कंपनी ठिकाण यू. बी. वाईन्स व्हॅलोंने वाईनयार्ड मालेगाव उत्पादन क्षमता लि. 50 लाख लिटर इगतपुरी पाल अस्टिंट वाईन मेकर 5 लाख लिटर दिंडोरी सुला विनया्डस 1 लाख लिटर नाशिक 11 दशलक्ष लिटरपेक्षा जास्त'

 हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना