वाय-फायच्या केबलचे काम करताना शॉर्टसर्किटने स्फोट; युवक भाजला

इंदिरानगर (जि.नाशिक) : वाय-फाय च्या केबलचे काम करत असताना पाथर्डी फाटा येथील प्रणव हाईट्स येथे शॉर्टसर्किटने झालेल्या स्फोटात सौरभ भुसारे हा युवक भाजला असून इमारतीतील विजेच्या उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे.

इमारतीतील विजेच्या उपकरणांचे मोठे नुकसान

या भागातील डेमसे यांच्या मालकीच्या असलेल्या नेटवर्कसाठी सौरभ या इमारतीच्या गच्चीवर काम करत होता. येथून जवळच असलेल्या विजेच्या अतिउच्च दाबाच्या वाहिनीच्या आसपास वायर घेतांना या उच्च दाबाच्या वाहिन्यांचा संपर्क झाल्याचा अंदाज वर्तवत झालेल्या शॉर्टसर्किटमुळे मोठा स्फोट झाला. स्फोट शक्तिशाली असल्याने इमारतीला त्या भागात खड्डा तर पडलाच शिवाय अनेकांच्या घरातील विजेची उपकरणे आणि सर्किट बोर्ड जळून खाक झाले.

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

घटनेची गंभीर दखल

स्थानिक रहिवाशांनी सौरवला सुरुवातीला वक्रतुंड रुग्णालयात दाखल नेले. मात्र ते कोवीड रुग्णालय असल्याने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. वीज कंपनीने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून कंपनीचे अधिकारी सखोल माहिती घेत आहेत.

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी