मालेगाव (जि.नाशिक) : दीड महिन्यात पतीसह तिन्ही संशयित तिला वारंवार टोमणे मारत होते. जाचाला कंटाळून मुलीने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.
मुलीची प्रकृती सुधारल्यानंतर पोलिसांकडे तक्रार
शेंदुर्णी येथील नवविवाहितेला घरी लोखंडी अँगलला दोरीने गळफास लावून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह तिघांविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. २५ जानेवारीला ही घटना घडली. पीडितेच्या वडिलांनी मुलीची प्रकृती सुधारल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली.
वारंवार टोमणे असह्य
रूपाली त्रिभुवन (वय १९) हिला पती लक्ष्मण त्रिभुवन (रा. शेंदुर्णी), नणंद छकुली कांबळे, नंदोई नंदू कांबळे (दोघे रा. शिरसोंडी) हे तिघे रूपालीला त्रास देत होते. रूपालीचा विवाह ८ जुलै २०२० ला झाला. दीड महिन्यात पतीसह तिन्ही संशयित तिला वारंवार टोमणे मारत होते. जाचाला कंटाळून मुलीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल
दुसरी घटना - अल्पवयीन मुलीला पळविले
मालेगाव- वजीरखेडे येथील अल्पवयीन मुलीला घरातून फूस लावून पळवून नेणाऱ्या अनोळखी संशयिताविरुद्ध वडनेर-खाकुर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. १४ वर्षीय मुलीला गुरुवारी (ता. २८) रात्री दहाच्या सुमारास फूस लावून पळवून नेले. नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवाराकडे शोध घेऊनही मुलगी मिळून न आल्याने पीडित मुलीच्या वडिलांनी वडनेर-खाकुर्डी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा - बालविवाह झालेल्या 'त्या' दुर्दैवी मुलीचा मृत्यू; आईची सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार