वावी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- वावी गावातील प्रतिष्ठित भांडे व्यापारी सुदाम मराळे यांच्या सुनबाई नूतन ऋषिकेश मराळे (21) यांचे डेंगूसदृश आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या मृत्युने वावीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत ताप येत असल्याकारणाने वावी येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तत्काळ सिन्नर व नंतर नाशिक येथे उपचार घेत असतानाच काहीसा रक्तदाब कमी झाला व श्वसनक्रियेस अडथळा येत होता, दरम्यान नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतानाच गुरुवारी रात्री 2. 30 च्या दरम्यान अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याआधीही वावीत डेंग्यू सदृश्य आजाराचा रुग्ण आढळलेला आहे.
हेही वाचा :
- Nashik ZP : जिल्हा परिषदेत कर्मचारी संपाला संमिश्र प्रतिसाद
- Nashik MIDC : एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी, प्रवेशद्वारावरच लावली नोटीस
- Nashik MIDC : एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी, प्रवेशद्वारावरच लावली नोटीस
The post वावीत डेंगूसदृश आजाराचा पहिला बळी, महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.