वाहनकोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरपर्यंत जात असतात. दि. २० जूनपासून त्र्यंबकेश्वर येथून पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे. पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी सहभागी झाल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल केले आहेत.

याप्रकरणी शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अधिसूचना काढल्या आहेत. त्यात शनिवार (दि. २२) पासून सकाळी ७ ते रविवारी (दि. २३) रात्री ९ पर्यंत वाहतूक मार्गात बदल केले आहेत. वरील सर्व प्रकारचे निर्बंध हे पोलिस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाची वाहने यांना लागू राहणार नाहीत.

वाहतुकीसाठी बंद केलेले मार्ग असे…

• पंचायत समिती ते मोडक सिग्नलकडे एकेरी बाजूने जाणाऱ्या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
• मोडक सिग्नल ते अशोकस्तंभाकडे एकेरी बाजूने जाणाऱ्या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
• अशोकस्तंभ ते रविवार कारंजाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
• रविवार कारंजा ते घुमाळ पॉइंट गाडगे महाराज पुतळा – बादशाही कॉर्नर – महात्मा फुले मार्केट काजीपुरा पोलिस चौकीदरम्यान, दुतर्फा मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
• काजीपुरा पोलिस चौकी ते शिवाजी चौक अमरधाम ते गणेशवाडी पंचवटीकडे दुतर्फा मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
• गणेशवाडी पंचवटी ते अमरधाममार्गे द्वारका या दुतर्फा मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
• द्वारकाकडून नाशिक रोडकडे एकेरी बाजूने जाणाऱ्या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
• दत्तमंदिर सिग्नल येथून बिटको चौक अवजड वाहने, हातगाडे यांना जाण्यास छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नाशिक रोडपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेश बंद करण्यात येत आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग असे ….

• मोडक सिग्ग्रल ते पंचायत समिती या त्र्यंबककडे जाणाऱ्या एकेरी मार्गावरून दोन्ही बाजूने दुतर्फा वाहतूक चालू राहील.
• अशोकस्तंभ ते मोडक सिग्नलकडे जाणाऱ्या एकेरी मार्गावरून दुतर्फा वाहतूक सुरू राहील.
• रविवार कारंजा ते धुमाळ पॉइंट गाडगे महाराज पुतळा जाणारी वाहतूक ही रविवार कारंजा सांगली बँक सिग्नल नेहरू गार्डनमार्गे इतरत्र जातील.
• गाडगे महाराज पुतळा ते बादशाही कॉर्नर जाणारी वाहतूक शालिमार खडकाळी सिग्ग्रलमार्गे इतरत्र जातील.
• बादशाही कॉर्नर ते महात्मा फुले मार्केटकडे जाणारी वाहतूक ही गाडगे महाराज पुतळा शालिमार – खडकाळी सिग्नलमार्गे इतरत्र जातील.
• महात्मा फुले मार्केट ते काजीपुरा पोलिस चौकीकडे जाणारी वाहतूक दूधबाजार खडकाळी सिग्नल सारडा सर्कलमार्गे इतरत्र जातील.
• संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज पालखी उपनगर सिग्रलवरून गेल्यानंतर वाहतूक उपनगर सिग्नल येथून डावीकडे वळून आम्रपालीनगरमार्गे जेल रोडकडे जाईल.
• दत्तमंदिर सिग्नल येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणारी वाहतूक दत्तमंदिर सिग्नल येथून उजवीकडे वळून सुराणा हॉस्पिटल सिन्नर फाटा येथून दत्तमंदिर रोडने सुराणा हॉस्पिटल, आनंदनगरी टी पॉइंट, सत्कार पॉइंट, रिपोर्ट कॉर्नर येथून रेल्वेस्थानक व तेथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाईल.
• पुणे ते नाशिक दरम्यानची दुतर्फा अवजड वाहतूक दत्तमंदिर चौक येथून वीर सावरकर पुलावरून सिन्नर फाटाकडे ये-जा करेल.

हेही वाचा: