विजयी विश्व तिरंगा प्यारा! कोकणकड्यावर फडकला सर्वात मोठा 73 फुटी तिरंगा; गिर्यारोहकांचा विक्रम

नाशिक : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोरर आयोजित हरिश्चंद्रगड-कोकणकडा
मोहिमेत नाशिकच्या गिर्यारोहकांनी कोकणकडा येथे भारताचा सर्वात मोठा 73 फूट तिरंगा फडकावून आणि राष्ट्रगीताचे गायन करून विक्रम केला आहे.

विश्वविक्रम प्रस्थापित केल्यामुळे नाशिककरांची मान उंचावली

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररकडून यासाठी ३ दिवसांच्या ट्रेकिंग मोहिमेचे आयोजन केले होते. यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन अनेकजण एकत्र आले होते. नाशिक, नंदुरबार, धुळे, उस्मानाबाद, सोलापूर, अहमदनगर, पुणे, मुंबई, नांदेड येथील 45 लोक या मोहिमेत सामील होते. यामध्ये नाशिकचे गिर्यारोहक राहुल बनसोडे, राहुल नंदेश्वर, पंकज बच्छाव यांनी या मोहिमेत सहभागी होऊन हा विक्रम प्रस्थापित केल्यामुळे नाशिककरांची मान उंचावली आहे.

73 फुटी तिरंगा

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 360 एक्सप्लोरर टीम हरिश्चंद्रगड सर करून कोकणकडा येथे पोहचली. त्यानंतर येथे 26 जानेवारी, सकाळी 7.30 वाजता 73 फुटी तिरंगा कोकणकडा येथे फडकवण्यात आला. याप्रसंगी मराठी चित्रपट अभिनेत्री मीरा जोशी व आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आनंद बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 

"प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण असून कोकणकड्यावर तिरंगा फडकवताना अतिशय अभिमान वाटला. 360 एक्सप्लोररमार्फत अशा अनेक मोहिमा आयोजित करून साहसी खेळाच्या प्रसारासाठी काम करण्याचा मानस आहे. ही मोहीम युनायटेड नेशन्सच्या गोल्ससाठी समर्पित होती."
- आनंद बनसोडे, एव्हरेस्टवीर, आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक

 हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

"मागील वर्षी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत प्रजासत्ताक दिनी कळसूबाई शिखर येथे संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून विश्वविक्रम केला होता.  यावर्षी भारतीय तिरंगा अतिशय उंच अश्या कोकणकडयावर फडकताना अतिशय अभिमान वाटत आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे सरांच्या सर्व मोहिमा या सामाजिक कार्याप्रती समर्पित असतात.'"
- शिवानी मंत्री व राहुल बनसोडे (आरव ऍडव्हेंचर 360 एक्सप्लोरर,नाशिक विभाग)

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच