विजय वडेट्टीवारांच्या ‘त्या’ वक्तव्या विरोधात नाशिकमध्ये साधूंकडून शंखनाद आंदोलन

नाशिक : ''साधू हे स्वतःचे हित साधवणारे असतात; संत हा समाजासाठी समर्पित असतो, यावर मी ठाम आहे, कुणाला कितीही टीका करु दे,'' मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांच्या  वक्तव्यानंतर नाशिकमध्ये साधूंनी या विरोधात शंखनाद आंदोलन पुकारले. नाशिकच्या रामकुंडावर हे आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी साधू हातात विरोधाचे फलक घेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

वडेट्टीवारांच्या वक्तव्याविरोधात नाशिकमध्ये साधूंकडून शंखनाद आंदोलन

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांच्या विचारधारेवर महाराष्ट्र उभा आहे. संत आणि साधू यामध्ये फरक आहे. संत हा समाजासाठी समर्पित आहे, तर संत म्हणजे दिशादर्शक आहे. साधू हे समाजाला लुबाडणारे आहे, यावर आजही मी ठाम आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. 'साधू हे नालायक असतात', असे वक्तव्य असलेला त्यांचा एक व्हिडिओ पुढे आला होता. त्यावर आचार्य तुषार भोसले यांनी आक्षेप घेतला होता. त्याबाबतच वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलं होत.

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

 

हेही वाचा -  नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुरडीला पळविले; घटना CCTV मध्ये.