चांदवड : घरात दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना राजदेरवाडी येथे रविवारी (दि.17) सकाळी घडली. रतन बाळू शिंदे (३५) असे मृताचे नाव आहे. ते सकाळी घरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने दुरुस्तीचे काम करत असताना त्यांना विजेचा धक्का लागला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी सुनील बाळू शिंदे यांच्या माहितीवरून पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिंदे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शिरसाठ करीत आहेत.
हेही वाचा :
- Dhule News : आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे निर्देश
- Pawar Vs Pawar: ‘कोणाच्या जाण्याने कोणाचे अडत नसते…’; बारामतीत सोशल मिडियावर फिरणाऱ्या ‘त्या’ फोटोची चर्चा
The post विजेचा धक्का लागून राजदेरवाडीचा तरुण शेतकरी ठार appeared first on पुढारी.