नाशिक : येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून विज्ञानवादी लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रीया अभिनेत्री व लेखिका मृणाल कुलकर्णी यांनी दिली.
गुरुवारी (ता. ४) येथील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमानिमित्त नाशिकला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, की डॉ. नारळीकर यांची निवड झाल्याचे स्वागत केले पाहिजे. यानिमित्त संमेलनातून विज्ञानवादी विचाराचा प्रचार-प्रसार होण्यास मदत होईल. संमेलनाध्यक्ष महिला प्रतिनिधी व्हायला हव्या होत्या का, या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या, की यापूर्वी अरुणा ढेरे यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे. यापुढील वर्षीदेखील महिला लेखिकेला संमेलनाध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा करू या. परंतु तत्पूर्वी साहित्य क्षेत्र आणखी प्रगल्भ करायचे असेल, तर लिखाण वाढले पाहिजे. विशेषतः महिला लेखिकांची संख्या वाढली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल