विद्यानगर येथे घरफोडी, रोख रकमेसह २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला

घरफोडी,www.pudhari.news

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा, येथील विद्यानगर येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकेमेसह २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेची देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबधित बातम्या :

याबाबत अधिक माहिती अशी की, देवळा शहरातील विद्यानगर येथील रहिवासी देविदास धर्मा ब्राम्हणकार हे गुरुवारी कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचे बघून रात्रीच्या सुमारास घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी घरातून २०,००० रुपयांचे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लहान मुलाची बाळी व अंगठी, ३ अंगठी प्रत्येकी १ ग्रॅम वजनाची व अर्धा ग्रॅम वजनाची २ कानातील बाळी, प्रत्येकी ५००० रुपये प्रति ग्रॅम प्रमाणे लोखंडी कपाटात ठेवलेले ५००० रुपये रोख असे एकूण २५००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घरातील समान अस्ताव्यस्त करून चोरटे पसार झाले आहेत. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडण्यासाठी लोखंडी टिकम रॉडचा वापर केला आहे.

या घटनेमुळे शहरातील उपनगरामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवणे गरजेचे बनले आहे. शहरात अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण नेहमी घडत असून, पोलिसांनी या अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. अधिक तपास सपोनि दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा :

The post विद्यानगर येथे घरफोडी, रोख रकमेसह २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला appeared first on पुढारी.